रेशन दुकानदारांचा कडकडीत बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2018 12:21 AM2018-01-16T00:21:24+5:302018-01-16T00:28:50+5:30
नाशिक : वाशीम जिल्ह्यातील मालेगाव येथे रेशन दुकानदारास झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ नाशिक शहरातील रेशन दुकानदारांनी बंद पाळून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. आधार सिडिंगचे वर्षानुवर्षे काम रेंगाळल्यामुळे ग्राहक दुकानदारांशी वाद घालत असून, त्यामुळेच अशा घटना घडत असल्याने स्वतंत्र यंत्रणेमार्फत आधार सिडिंगचे काम करावे तोपर्यंत पॉस मशीनचे धान्य वाटपाचा आग्रह धरू नये, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
नाशिक : वाशीम जिल्ह्यातील मालेगाव येथे रेशन दुकानदारास झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ नाशिक शहरातील रेशन दुकानदारांनी बंद पाळून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. आधार सिडिंगचे वर्षानुवर्षे काम रेंगाळल्यामुळे ग्राहक दुकानदारांशी वाद घालत असून, त्यामुळेच अशा घटना घडत असल्याने स्वतंत्र यंत्रणेमार्फत आधार सिडिंगचे काम करावे तोपर्यंत पॉस मशीनचे धान्य वाटपाचा आग्रह धरू नये, अशी मागणीही त्यांनी केली आहे. रेशन दुकानदाराने आधार कार्ड मागितल्यामुळे रेशन दुकानदार गणेश तिवारी यांना कार्डधारक इब्राहिम खान याने बेदम मारहाण केली. शासनाच्या निर्देशावरूनच दुकानदाराने आधारकार्डाची मागणी केली होती.