रेशन दुकानदारांच्या संपावरून संघटनेत फूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2018 03:31 PM2018-03-30T15:31:29+5:302018-03-30T15:31:29+5:30

रेशन दुकानदारांच्या मागण्यांबाबत १९ मार्च रोजी राज्यातील हजारो रेशन दुकानदारांनी विधीमंडळावर मोर्चा काढून मोठे शक्तीप्रदर्शन केले होते. परंतु तत्पुर्वीच पुरवठामंत्री बापट यांनी रेशन दुकानदारांच्या मागण्या अव्यावहारिक व अवाजवी असल्याचे जाहीर केले होते. मात्र मोर्चेकरी दुकानदारांच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक

Ration shoppers strike in association with split | रेशन दुकानदारांच्या संपावरून संघटनेत फूट

रेशन दुकानदारांच्या संपावरून संघटनेत फूट

Next
ठळक मुद्देअध्यक्षांचे आदेश ऐकण्यास दुकानदारांचा नकारसंप करू पाहणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करण्याची तयारी

नाशिक : दोन दिवसांपुर्वी रेशन दुकानदारांच्या शिष्टमंडळाने राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीष बापट यांची भेट घेवून दुकानदारांच्या मागण्यांवर सकारात्मक चर्चा घडवून रेशन दुकानदारांचा १ एप्रिलपासून सुरू होणारा संप स्थगित केल्याचे जाहीर केलेले असतानाच मंत्री बापट यांच्या भेटीसाठी न गेलेल्या रेशन दुकानदार संघटनेच्या अध्यक्षांनी मात्र रेशन दुकानदारांचा संप सुरूच राहणार असल्याचे पत्रक प्रसिद्ध केल्यामुळे दुकानदार पेचात सापडले आहेत. दुसरीकडे संप करू पाहणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करण्याची तयारी पुरवठा खात्याचे सुरू केल्याने संपाच्या भानगडीत न पडण्याच्या विचारात दुकानदार असल्याने नाशिक जिल्ह्यातील दुकाने सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
रेशन दुकानदारांच्या मागण्यांबाबत १९ मार्च रोजी राज्यातील हजारो रेशन दुकानदारांनी विधीमंडळावर मोर्चा काढून मोठे शक्तीप्रदर्शन केले होते. परंतु तत्पुर्वीच पुरवठामंत्री बापट यांनी रेशन दुकानदारांच्या मागण्या अव्यावहारिक व अवाजवी असल्याचे जाहीर केले होते. मात्र मोर्चेकरी दुकानदारांच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक विचार करीत असल्याचे आश्वासन त्यांनी दिले होते. त्यामुळे दुकानदार संघटनेने १ एप्रिलपासून राज्यपातळीवर पुकारलेल्या बेमुदत बंदबाबत संभ्रम निर्माण झाला होता. या सर्व पार्श्वभुमीवर दि. २७ मार्च रोजी फलटण, सातारा, पुणे, नाशिक, नगर, नांदेड येथील रेशन दुकानदार संघटनेच्या पदाधिकाºयांना पुरवठामंत्री गिरीष बापट यांनी मुंबईत चर्चेसाठी बोलावले व या बैठकीत रेशन दुकानदारांच्या मागण्यांबाबत येत्या काही दिवसात सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्याने रेशन दुकानदारांचा नियोजीत १ एप्रिलपासूनचा संप स्थगित करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले होते. अर्थातच पुरवठामंत्र्यांच्या उपस्थितीत मुंबईत झालेल्या बैठकीत रेशन दुकानदारांचा मंत्रालायावर मोर्चा काढण्यासाठी पुढाकार घेणारे आॅल महाराष्टÑ फेअर प्राईज शॉप किपर्स फेडरेशनचे अध्यक्ष माजी खासदार गजानन बाबर व आॅल महाराष्टÑ स्वस्त धान्य दुकानदार महासंघाचे संस्थापक व राष्टÑीय अध्यक्ष पुष्कराज (काका) देशमुख हे अनुपस्थित होते. त्यामुळे त्यांच्या गैरहजेरीत काही जिल्ह्यातील रेशन दुकानदारांनी संप स्थगित करण्याची केलेली घोषणा न रूचल्यामुळे त्यांनी बुधवारी या संदर्भात पत्रक प्रसिद्धीस देवून संघटनेने कोणताही संप स्थगित केलेला नसून, या संदर्भातील अफवांवर विश्वास न ठेवण्याचे तसेच १ एप्रिल पासून संप सुरू राहणार असल्याचे जाहीर केले आहे. कोणत्याही दुकानदारांनी १ एप्रिलपासून ईपीडीएस मशिनचा वापर करू नये असे म्हटले आहे.

Web Title: Ration shoppers strike in association with split

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.