बंगीय परिषदेतर्फे आदिवासींना शिधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2020 11:44 PM2020-04-25T23:44:15+5:302020-04-25T23:44:26+5:30

कोरोनामुळे देशभर लागू केलेल्या संचारबंदीचा फटका ग्रामीण भागातील दुर्गम आदिवासी, कष्टकरी जनतेला बसत असून, बाहेर कामधंद्यासाठी बाहेरच पडता येत नसल्याने त्यांचे आर्थिक चक्र थंडावले आहे. त्यामुळे अशा परिवारातील नागरिकांना घरातील रेशन व अत्यावश्यक वस्तूंसाठी मोठी कसरत करावी लागत आहे. ही परिस्थिती ओळखून नाशिक येथील बंगीय परिषदेच्या वतीने नाशिक जिल्ह्यातील आदिवासी दुर्गम भागात शिधापत्रिका नसलेल्या नागरिकांना मदत करण्यात येत आहे.

Ration to the tribals by the Bangiya Parishad | बंगीय परिषदेतर्फे आदिवासींना शिधा

बंगीय परिषदेतर्फे आदिवासींना शिधा

Next

नांदूरवैद्य : कोरोनामुळे देशभर लागू केलेल्या संचारबंदीचा फटका ग्रामीण भागातील दुर्गम आदिवासी, कष्टकरी जनतेला बसत असून, बाहेर कामधंद्यासाठी बाहेरच पडता येत नसल्याने त्यांचे आर्थिक चक्र थंडावले आहे. त्यामुळे अशा परिवारातील नागरिकांना घरातील रेशन व अत्यावश्यक वस्तूंसाठी मोठी कसरत करावी लागत आहे. ही परिस्थिती ओळखून नाशिक येथील बंगीय परिषदेच्या वतीने नाशिक जिल्ह्यातील आदिवासी दुर्गम भागात शिधापत्रिका नसलेल्या नागरिकांना मदत करण्यात येत आहे.
त्र्यंबकेश्वर तालुक्याच्या मेटघर किल्ला ग्रामपंचायत अंतर्गत सुमारे सुपल्याची मेट, गंगाद्वार, विनायकखिंड, पठारवाडी, जांबाचीवाडी, महादरवाजा मेट व ब्रह्मगिरी पायथा परिसरातील सुमारे ४४ आदिवासी कुटुंबांना जीवनाश्यक साहित्याचे आमदार खोसकर यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी इगतपुरी विधानसभा माजी अध्यक्ष कमलाकर नाठे, नाशिक बंगीय परिषदेचे तारक बॅनर्जी, नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संपतराव सकाळे, शांताराम मुळाणे, गोकुळ थेटे, नीलेश रॉय, सूचित बोस, सुब्रोतो बॅनर्जी, इंद्रनील सान्याल, बिकास डॉन, रघुनाथ दास, बिधान हाजरा, सरपंच सरिता झोले, ग्रामसेविका नीता कोळी आदी उपस्थित होते.

Web Title: Ration to the tribals by the Bangiya Parishad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.