मालेगावी एटीएम केंद्रांवर खडखडाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2018 02:19 PM2018-11-05T14:19:50+5:302018-11-05T14:20:03+5:30
मालेगाव : शहरातील बहुतांशी एटीएम केंद्रामध्ये पैसे नसल्याने खडखडाट जाणवत आहे.
मालेगाव : शहरातील बहुतांशी एटीएम केंद्रामध्ये पैसे नसल्याने खडखडाट जाणवत आहे. ऐन दिवाळी सणाच्या काळात राष्टÑीयकृत बॅँकांसह इतर बॅँकांचे एटीएम केंद्र बंद असल्याने नागरिकांचे हाल होत आहे. दिवाळी काळात खरेदीसाठी नागरिकांना पैशांची गरज असते. मात्र शहरातील बहुतांशी एटीएम केंद्र बंद पडले आहेत. कॅश संपल्याचा बोर्ड एटीएम केंद्रांवर लावण्यात आल्याने एटीएमधारकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. इतर वेळेसही मालेगावातील बहुतांशी एटीएम केंद्र बंद असतात. नाशिक नंतर मोठी बाजारपेठ असलेले मालेगावात एटीएम केंद्रे चोवीस तास सुरू असणे गरजेचे आहे. मात्र बॅँक प्रशासनाच्या आडमुठे धोरणाचा फटका सर्वसामान्य खातेधारकांना बसत आहे. एटीएम कार्ड केवळ शोभेची वस्तु बनल्याचा अनुभव नागरिकांना येत आहे.