वारकरी महामंडळाच्या संपर्क प्रमुखपदी रौंदळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:15 AM2021-07-31T04:15:36+5:302021-07-31T04:15:36+5:30
माध्यमिक शाळा, कॉलेज या ठिकाणी जाऊन मोफत समाज प्रबोधनाचे कार्य करणाऱ्या बागलाण तालुक्यातील दुर्गम भागातील तळवाडे दिगर येथील रहिवासी ...
माध्यमिक शाळा, कॉलेज या ठिकाणी जाऊन मोफत समाज प्रबोधनाचे कार्य करणाऱ्या बागलाण तालुक्यातील दुर्गम भागातील तळवाडे दिगर येथील रहिवासी कृष्णा रौंदळ यांच्या कार्याची दखल घेऊन राज्याचे कार्याध्यक्ष ह.भ.प. रामेश्वर महाराज शास्त्री यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन त्यांची महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळाच्या जिल्हा संपर्क प्रमुखपदी निवड करण्यात आली. यावेळी ह.भ.प. रामकृष्ण महाराज लहवितकर महामंडलेश्वर देवबाप्पा (फरशीवाले बाबा), राज्याध्यक्ष आर.के. रांजणे, जिल्हा अध्यक्ष श्रावण महाराज आहिरे कुकाणेकर, सचिव रेवाजी बालाजी वाळुंज, प्रभाकर महाराज फुलसुंदर, जिल्हा सचिव लहू महाराज अहिरे उपस्थित होते. या निवडीचे आमदार दिलीप बोरसे, द्वारकाधीश कारखान्याचे संस्थापक शंकरराव सावंत, नामपूर बाजार समितीचे संचालक कृष्णा भामरे, सटाणा बाजार समितीचे संचालक संजय सोनवणे यांनी स्वागत केले.
इन्फो...व्यसनमुक्तीसारखे समाजकार्य मोफत करून समाजातील शेकडो तरुणांना चांगल्या मार्गाला लावणाऱ्या कृष्णा रौंदळ यांची सटाणा तालुक्यातून सार्थ निवड झाली असून यापुढे त्यांनी राज्यभरात फिरून व्यसनमुक्तीसाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन रामकृष्ण महाराज लहवितकर यांनी केले.
फोटो - ३० मुंजवाड १
ओझर येथे महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळाच्या जिल्हा संपर्क प्रमुखपदी निवड झाल्याचे नियुक्तीपत्र कृष्णा रौंदळ यांना प्रदान करताना ह.भ.प. रामेश्वर महाराज शास्त्री.
300721\30nsk_28_30072021_13.jpg
ओझर येथे महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळाच्या जिल्हा संपर्क प्रमुखपदी निवड झाल्याचे नियुक्तीपत्र कृष्णा रौंदळ यांना प्रदान करताना ह.भ.प.रामेश्वर महाराज शास्त्री.