अश्वाचा केला विधीवत दशक्रि या विधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 05:08 PM2018-12-11T17:08:58+5:302018-12-11T17:12:30+5:30

नांदूरवैद्य : बेलगाव कुºहे येथील सोनू नामक अश्वाचा आजारपणामुळे मृत्यू झाला. त्याचा शोक व्यक्त करीत देवकर कुटुंबीयांनी यांनी त्यास आपल्या घरातील एक व्यक्ती मानल्याने शोकाकुल वातावरणात विधीवत दशक्रि या विधी करु न दिला अखेरचा निरोप दिला.

Rava Vidya Devi Dashodari | अश्वाचा केला विधीवत दशक्रि या विधी

अश्वाचा केला विधीवत दशक्रि या विधी

Next
ठळक मुद्देबेलगाव कुºहे : देवकर कुटुंबीयांकडून ‘सोनू’ला अखेरचा निरोप

नांदूरवैद्य : बेलगाव कुºहे येथील सोनू नामक अश्वाचा आजारपणामुळे मृत्यू झाला. त्याचा शोक व्यक्त करीत देवकर कुटुंबीयांनी यांनी त्यास आपल्या घरातील एक व्यक्ती मानल्याने शोकाकुल वातावरणात विधीवत दशक्रि या विधी करु न दिला अखेरचा निरोप दिला.
भूतदया गाई पशूंचे पालन !
तान्हेल्या जीवन वना माजी !!
या संत वचनाप्रमाणे बेलगाव कुºहे येथील देवकर कुटुंबीयांनी अश्वाचे लहानपणापासून गेल्या वीस वर्षांपासून संगोपन केले होते. त्यामुळे त्यांना या अश्वाचा मोठा लळा लागला. सकाळी उठल्यानंतर त्याला नित्याप्रमाणे आंघोळ, चारापाणी नित्य नियमाने केले जात होते.
लग्नकार्यात नवरदेव मिरवणुकीसाठी सोनूला सुरेख सजवले जायचे मोठ्या डौलात त्याचा रुबाब असे पाहणाऱ्याच्या डोळ्यात भरेल असा त्याचा बाणा होता. परंतु अचानक तो आजारी झाला. नाशिकला आणून दवाखान्यात त्याच्यावर उपचार करण्यात आले परंतु ‘सोनू’ने या जगाचा निरोप घेतला.
त्याच्या मृत्यूने देवकर कुटुंबातील सर्वांना दु:ख झाले. घरातील सदस्यांबरोबरच गावातील ग्रामस्थही भावनाविवश झाले होते.
अखेर देवकर कुटुंबियांच्या सांगण्यावरुन भरवीर येथील गुरुजींनी पांडुरंग देवकर व संजय देवकर यांच्या हातून सोनूच्या नावाने होमहवन तसेच त्याचा दफनविधी केलेल्या ठिकाणी पिंडदान करुन विधीवत दशक्रिया विधी केला. त्यानंतर ग्रामस्थांना जेवण दिले.
यावेळी त्र्यंबक देवकर, संपत देवकर, अजय देवकर, सरपंच राजाभाऊ गुळवे, उपसरपंच कोंडाजी गुळवे, साहेबराव धोंगडे, सोमनाथ मांडे, नामदेव गुळवे, गोकुळ गुळवे, हरिभाऊ गुळवे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
-----------------
(फोटो ११ घोडा)
येथील संजय देवकर यांनी सोनू नावाच्या घोडयाचा विधीवत दशिक्र या विधी केला याप्रसंगी पिंडदान करतांना देवकर कुटुंबीय व ग्रामस्थ.

Web Title: Rava Vidya Devi Dashodari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक