रावणाचे दहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2017 01:06 AM2017-10-01T01:06:31+5:302017-10-01T01:06:37+5:30

विजयादशमीच्या मुहूर्तावर असत्यावर सत्याचा विजय म्हणून शहरात विविध सार्वजनिक मंडळांच्या व संस्थांच्या वतीने रावणदहन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, नागरिकांची रावणदहन कार्यक्रमाला गर्दी लोटली होती. शहरातील गोदाकाठ, गंगापूररोडवरील माणिकनगर, गांधीनगर, राजीवनगर आदी ठिकाणी रावणाच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.

 Ravana's combustion | रावणाचे दहन

रावणाचे दहन

Next

नाशिक : विजयादशमीच्या मुहूर्तावर असत्यावर सत्याचा विजय म्हणून शहरात विविध सार्वजनिक मंडळांच्या व संस्थांच्या वतीने रावणदहन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, नागरिकांची रावणदहन कार्यक्रमाला गर्दी लोटली होती. शहरातील गोदाकाठ, गंगापूररोडवरील माणिकनगर, गांधीनगर, राजीवनगर आदी ठिकाणी रावणाच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. गंगापूररोड परिसरात माणकिनगरमधील शिवसत्य मैदानावर तुळजाभवानी मंदिर ट्रस्टच्या वतीने नवरात्रोत्सव आयोजित करण्यात आला होता. या उत्सवाची सांगता विजयादशमीच्या मुहूर्तावर सुमारे ५० फुटी रावणाचा पुतळा दहणाने करण्यात आली . दशमुखी रावणाच्या पुतळ्यावर आकर्षक रोषणाई करण्यात आली होती . उपस्थित शेकडो नागरिकांनी रावणदहनापूर्वी रावणासोबत सेल्फी क्लिक केली. दरम्यान, पोलीस आयुक्त डॉ.रवींद्रकुमार सिंगल यांनी सपत्नीक देवीची पूजा केली. पूजेनंतर रावणाच्या प्रतीकात्मक पुतळा त्यांच्या हस्ते दहन करण्यात आला. यावेळी आमदार सीमा हिरे, नगरसेवक योगेश हिरे, महेश हिरे आदी मान्यवर उपस्थित होते.  यावेळी प्रभू रामचंद्र की जय, बोल दुर्गा माते की जय अशा घोषणांनी मैदान दुमदुमले होते. नाशिकच्या ढोल पथकाने आपल्या खास शैलीत ढोलवादन करत वातावरणात रंग भरला. साडेआठ वाजेच्या सुमारास रावणाचे दहन करण्यात आले. रावण दहनादरम्यान फटाक्यांची जोरदार आतषबाजी करण्यात येत होती. एकापेक्षा एक रंगीत शोभेचे फटाके फोडण्यात येत असल्यामुळे आसमंत उजळून निघाला होता.
उपनगरला साठफुटी रावणाचे दहन
गांधीनगर येथे नवरात्रीनिमित्त आयोजित रामलीला नाटिकेचा समारोप हजारो नागरिकांच्या उपस्थितीत रावणदहनाने उत्साहात झाला. यावर्षीही जल्लोषपूर्ण वातावरणात हा उत्सव पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या उत्सवाची पत्राद्वारे प्रशंसा केल्याने यंदा क्लबचा उत्साह अधिक द्विगुणित झाला होता. विजयादशमी अर्थात दसºयाच्या मुहूर्तावर पारंपरिक पद्धतीने गांधीनगर येथील वेल्फेअर क्लबच्या मैदानावर रामलीला नाटिकेमध्ये शनिवारी (दि.३०) सायंकाळी सात वाजता सुमारे तासभर प्रभू रामचंद्र यांची वानरसेना व रावणाची राक्षस सेना यांच्यात घनघोर युद्धाचे दृश्य थेट मैदानावर सादर करण्यात आले.अखेर रामलीलेतील प्रभू रामचंद्रांच्या वानरसेनेचा विजय झाला. यावेळी मैदानावर उभारण्यात आलेल्या ६० फुटी रावणाच्या भव्यदिव्य प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. यावेळी करण्यात आलेल्या नेत्रदीपक फटाक्याच्या आतषबाजीने उपस्थितांच्या डोळ्याचे पारणे फेडले होते. सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार देवयानी फरांदे, उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे, सहाय्यक आयुक्त सचिन गोरे, नाशिकरोड कारागृह अधीक्षक राजकुमार साळी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाजीराव महाजन, मुद्रणालयाचे उपमहाप्रबंधक ए.के. सक्सेना, विजय वाघेले, मनोहर बोराडे, रामलीला समितीचे महासचिव कपिल शर्मा, नगरसेवक अनिल ताजनपुरे, राहुल दिवे, सुषमा पगारे, आशा तडवी, रवी पगारे, हरिष परदेशी, संजय लोळगे आदि मान्यवर उपस्थित होते.

Web Title:  Ravana's combustion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.