इंग्लिश स्कूलमध्ये विकृतींच्या रावणाचे दहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2018 03:57 PM2018-10-17T15:57:18+5:302018-10-17T15:57:35+5:30
लासलगाव : येथील इंग्लिश मेडीयम स्कूलमध्ये नवरात्र उत्सवानिमित्त विविध कार्यक्र मांचे आयोजन करण्यात आले होते.या निमित्त शाळेतील विद्यार्थ्यांनी पारंपारिक वेशभूषा करून विविध गीतांवर दांडिया नृत्य सादर केले.
लासलगाव : येथील इंग्लिश मेडीयम स्कूलमध्ये नवरात्र उत्सवानिमित्त विविध कार्यक्र मांचे आयोजन करण्यात आले होते.या निमित्त शाळेतील विद्यार्थ्यांनी पारंपारिक वेशभूषा करून विविध गीतांवर दांडिया नृत्य सादर केले.
संस्थेचे जनरल सेक्र ेटरी गोविंद होळकर यांच्या संकल्पनेतून पारंपारिक पद्धतीने रावण दहन न करता शाळेच्या कला शिक्षिका मृणाल बकरे व भारती पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तेजस पोटे, प्रियंका कोकणे, प्रशांत खुर्दे व पियुष पाटील या विद्यार्थ्यांनी शाळेतील टाकाऊ वस्तूंपासून पर्यावरण पूरक रावणाच्या प्रतिमेची निर्मिती केली. रावणाच्या दहा तोंडांना अंधश्रध्दा, भ्रष्टाचार, स्त्रीभ्रूण हत्या, प्रदूषण, अहंकार, जातीयवाद, प्रादेशिकवाद, स्त्री-पुरुष विषमता, हुंडाबळी आदी विकृतींचे नावे देण्यात आली होती. विजयादशमी निमित्त उपस्थितांना या विकृतींची माहिती देऊन तिचे दहन करण्याचे आवाहन या प्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य हसमुख पटेल यांनी केले. उप मुख्याध्यापिका माधवी सहाय यांनी नवरात्रीची माहिती दिली. प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांनी यावेळी विविध रंगीत आकर्षित दिवे बनविले याकामी त्यांनी विभाग प्रमुख आशा जाधव, भारती पवार यांनी सहकार्य केले. सूत्रसंचालन प्रियदर्शनी गायकवाड यांनी केले.