शाळाबाह्य मुलांना प्रवाहात आणावे रवींद्रकुमार सिंगल : वासंतिक बालसंस्कार शिबिराचा समारोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2018 12:34 AM2018-05-05T00:34:11+5:302018-05-05T00:34:11+5:30
पंचवटी : झोपडपट्टी परिसरात राहणाऱ्या शाळाबाह्य मुलांना शैक्षणिक प्रवाहात आणून त्यांच्यातील कलागुणांना वाव मिळवून दिल्याने त्यांचा आत्मविश्वास वाढतो.
पंचवटी : झोपडपट्टी परिसरात राहणाऱ्या शाळाबाह्य मुलांना शैक्षणिक प्रवाहात आणून त्यांच्यातील कलागुणांना वाव मिळवून दिल्याने त्यांचा आत्मविश्वास वाढतो. शिक्षणापासून वंचित असलेल्या मुलांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणून त्यांच्या माध्यमातून एक नवा आदर्श समाज घडविण्याचा प्रयत्न असल्याचे प्रतिपादन पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी केले. फुलेनगर मनपा शाळेत पोलीस आयुक्तालय व एनजीओ फोरम, आस फाउंडेशन यांच्या वतीने बालबिरादरी प्रकल्पांतर्गत वासंतिक बालसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचा समारोप व प्रशस्तीपत्रक वितरण सोहळा संपन्न झाला. त्याप्रसंगी सिंगल बोलत होते. वरिष्ठ निरीक्षक दिनेश बर्डेकर यांनी पंचवटीत गुन्हेगारीच्या मुळाशी जाऊन काम केल्याचे समाधान व्यक्त करून नाशिक शहर गुन्हेगारी तसेच भयमुक्त करण्यासाठी जनतेने पोलीस खरा मित्र या भावनेतून पोलिसांना सहकार्य करावे, असे ते म्हणाले. मुलांना गायन, नृत्य, हस्तकला, व्यक्तिमत्त्व विकास, वैद्यकीय आरोग्यविषयक मार्गदर्शन शिबिरात करण्यात आले. यावेळी रमेश बोराळे, अंजना बोराळे या अंध दांपत्याने ‘कायदा तोडू नका तुम्ही सिग्नल तोडू नका’ हे प्रबोधनपर गीत सादर केले. कार्यक्र माला पोलीस उपआयुक्त विजय मगर, श्रीकृष्ण कोकाटे, सहायक पोलीस आयुक्त विजयकुमार चव्हाण, विजय देवरे, अशोक नखाते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनेश बर्डेकर, सुनीलकुमार पुजारी, सुभाषचंद्र देशमुख, सीताराम कोल्हे, नॅबचे मुक्तेश्वर मुनशेट्टीवार, नगरसेवक शांता हिरे, जतिंदरसिंग, सोमनाथ राठी, शुभांगी बैरागी, सचिन पवार, शोभा पवार, राजू शिरसाठ, मुकुंद गांगुर्डे, आसावरी देशपांडे, प्रतीक शुक्ल, अमित पंडित आदींसह नागरिक उपस्थित होते.