नृत्य, खेळांनी बहरला ‘रवींद्र मेळा’
By admin | Published: December 12, 2015 11:49 PM2015-12-12T23:49:59+5:302015-12-12T23:50:53+5:30
नृत्य, खेळांनी बहरला ‘रवींद्र मेळा’
नाशिक : नृत्य आविष्कार, कराटे- स्केटिंगसारखे खेळ आणि अन्य उपक्रमांनी रवींद्रनाथ टागोर इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये भरविण्यात आलेला ‘रवींद्र मेळा’ विद्यार्थ्यांना मौजमजेबरोबरच कलाविष्कारासाठी महत्त्वपूर्ण ठरला. मुलांच्या सुप्तगुणांना वाव देण्यासाठी टागोर स्कूलच्या प्रांगणात शाळा आणि पालक शिक्षक संघ, तसेच रवींद्र विद्या प्रसारक मंडळ यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. निमाचे माजी अध्यक्ष रवि वर्मा, संस्थेचे अध्यक्ष मनोज पिंगळे आणि निर्भय फाउंडेशनचे अध्यक्ष देवेंद्र भुतडा प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. व्यासपीठावर संस्थेच्या सरचिटणीस वासंतीताई गटणे, समन्वयक संचालक वसंतराव राऊत, तसेच अन्य संचालक उपस्थित होते. यावेळी मुलांनी कराटे, स्केटिंग, समूहनृत्य, कथ्थक नृत्य असे विविध आविष्कार मृणालिनी वालझाडे, प्रियंका फडणीस, रोहन भालेराव, दीपा वाकचौरे, हरीश्री तांबट यांच्या मार्गदर्शनाखाली सादर केले. प्रमुख अतिथींचा परिचय आणि सूत्रसंचालन प्राचार्य अमृत राव यांनी केले, तर आभार रश्मी वाधवानी यांनी आभार मानले. यावेळी अनेक मनोरंजक खेळ आणि मुलांनी उभारलेले स्टॉल्स सादर करण्यात आले होते. मेळ्यास पालकही उपस्थित होते.