नाशिक मनपाचे बेपत्ता अभियंता रवींद्र पाटील आज सकाळी परतले
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2018 09:18 AM2018-06-01T09:18:15+5:302018-06-01T09:18:15+5:30
कामाच्या अतिताण असल्यामुळे बेपत्ता झाले होते.
नाशिक- कामाच्या अतिताण असल्यामुळे बेपत्ता झालेले नाशिक महापालिकेचे सहाय्यक अभियंता अखेर आज सकाळी सहा वाजता घरी पोहोचले असून सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
या प्रकरणात नाशिक महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कामकाजावर टीका होत होती. गेल्या शनिवारी सकाळी नाशिकरोड येथे आयोजित वॉक विथ कमिशनर या कार्यक्रमाला जातो असं सांगून पहाटे घरातून बाहेर पडल्यानंतर नगर रचना विभागाचे सहाय्यक आभियंता पाटील बेपत्ता झाले होते. त्यांच्या पत्नीला घराबाहेर असलेल्या त्यांच्या मोटारीत कामाच्या अति ताणामुळे आपण जात असल्याची चिठ्ठी सापडल्याने खळबळ उडाली होती. पाटील यांच्यावर कामाचा ताण असल्याने तुकाराम मुंढे यांच्या विरोधात कर्मचारी संघटना सरसावल्या होत्या परन्तु आज सकाळी 6 वाजता पाटील सुखरुप घरी पोहोचल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली आहे.