रावळगावच्या शेतकऱ्याचा सहा वर्षांपासून लढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:11 AM2021-06-18T04:11:11+5:302021-06-18T04:11:11+5:30

शेतकरी रमेश बाबूलाल येवले यांची सन १९७५ मध्ये रावळगाव येथील गट नंबर ...

Rawalgaon farmers fight for six years | रावळगावच्या शेतकऱ्याचा सहा वर्षांपासून लढा

रावळगावच्या शेतकऱ्याचा सहा वर्षांपासून लढा

Next

शेतकरी रमेश बाबूलाल येवले यांची सन १९७५ मध्ये रावळगाव येथील गट नंबर २९५/२९६/२९७/३२० मधील एकूण ३२ एकर शेतजमीन रावळगाव कारखान्यास वर्ग झाली होती. सन १९७६/७७ मध्ये यापैकी ९ एकर ४ गुंठे जमीन येवले यांना परत मिळाली. उर्वरित २२ एकर ३६ गुंठे जमीन ही महामंडळास वर्ग झाली. कालांतराने शासनाने सदर जमीन संबंधित शेतकऱ्यांना परत करण्याचे आदेश दिले. या आदेशाप्रमाणे पीडित शेतकरी येवले यांना त्यांच्या हक्काची २२ एकर ३६ गुंठे जमीन मिळणे अपेक्षित असताना त्यांना फक्त १८ एकर २४ गुंठे जमीन मिळाली. यातही ७/१२ उताऱ्यावर असलेल्या १८ एकर २४ गुंठे जागेपैकी प्रत्यक्ष मोजणी केल्यावर सदर जागा फक्त ११ एकर १४ गुंठे इतकीच भरली. आधीच ४ एकर जमीन कमी मिळाली त्यात मिळालेल्या जमिनीत ७ एकर जमिनीचा फरक असल्याने पीडित शेतकरी येवले हे शासन दरबारी ६ वर्षांपासून चकरा मारून न्याय मागत आहेत. प्रत्येक वेळी त्यांच्या पदरी निराशाच आल्याने येवले यांनी १५ ऑगस्ट रोजी आत्महत्येचा इशारा दिला आहे.

Web Title: Rawalgaon farmers fight for six years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.