आर.सी. बाफना ज्वलेर्समध्ये आभूषणांवर विमा सुविधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:14 AM2021-01-22T04:14:46+5:302021-01-22T04:14:46+5:30

नाशिक : सुवर्णालंकारामध्ये नाशिकमधील आघाडीचे दुकान असलेल्या जळगावच्या रतनलाल सी. बाफना ज्वेलर्स आणि दागिन्यांवर विमा सुविधा देणारी कंपनी ...

R.C. Insurance facility on jewelery at Bafna Jewelers | आर.सी. बाफना ज्वलेर्समध्ये आभूषणांवर विमा सुविधा

आर.सी. बाफना ज्वलेर्समध्ये आभूषणांवर विमा सुविधा

Next

नाशिक : सुवर्णालंकारामध्ये नाशिकमधील आघाडीचे दुकान असलेल्या जळगावच्या रतनलाल सी. बाफना ज्वेलर्स आणि दागिन्यांवर विमा सुविधा देणारी कंपनी ‘ओलॉकर’ यांनी एकत्रित येऊन आभूषणांवर विमा उतरविण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे अल्पकाळातच दागिन्यांवरील विमा निवडणाऱ्या ग्राहकांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

दागिन्यांची खरेदी ही फक्त भावनिक खरेदी नसून याकडे भविष्यातील चांगली गुंतवणूक आणि जमापुंजी म्हणून भारतातील लोक पाहतात. सुज्ञ सोन्याचे विक्रेते आणि ग्राहक यांना सुरक्षेच्या दृष्टिकोनातून दागिन्यांसोबत मिळणाऱ्या विम्याचे महत्त्व मोठ्या प्रमाणात समजू लागले आहे. याबाबत आर. सी. बाफना ज्वेलर्सचे संचालक राहुल बाफना यांनी सांगितले की, चोरीच्या भीतीने सुरक्षिततेसाठी बँकेच्या लॉकरमध्ये ठेवण्याऐवजी दागिने परिधान करणे महत्त्वाचे आहे. ओलॉकरची सदस्यता आधारित विमा सेवा महिलांना त्यांचे दागदागिने मुक्तपणे घालण्याचे स्वातंत्र्य देते. तर ओलॉकरचे सहसंस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शेठिया यांनी सांगितले, विम्यामुळे या गुंतवणुकीला केवळ चोरीच नव्हे तर इतर अनेक गोष्टींपासून संरक्षण मिळणार आहे. ग्राहक या सुविधेमुळे आनंदी आहेत. तर ग्राहक गायकवाड यांनीही ही सुविधा केवळ आपल्या दागिन्यांचे संरक्षण करत नाही तर दागिन्यांच्या किमतीची हमी म्हणूनदेखील काम करत असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, ओलॉकरची दागिने विमा सेवा आज देशभरातील १९ राज्यांत ८५० आणि इतर किरकोळ भागीदारांद्वारे उपलब्ध आहे. कंपनीने आत्तापर्यंत दागिन्यांवरील ९८ टक्क्यांहून अधिक दावे निकाली काढले आहेत.

महत्वाची सूचना :

सदर बातमी २ बाय ८ या आकारातच घ्यावी. प्रसंगी एडीट करावी.

Web Title: R.C. Insurance facility on jewelery at Bafna Jewelers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.