मनपाच्या कर्मचाऱ्यांवरील कामाच्या ताणाची पुन्हा चर्चा
By संजय पाठक | Published: October 31, 2019 01:28 PM2019-10-31T13:28:17+5:302019-10-31T13:31:49+5:30
नाशिक : महापालिकेचे पश्चिम विभागाचे विभागीय अधिकारी अनिल नरसिंगे यांच्या आकस्मिक निधनामुळे पुन्हा एकदा कर्मचारी आणि अधिकायांवरील ताण-तणावाची चर्चा होऊ लागली आहे. गेल्या काही वर्षांत भरती तर बंदच उलट अधिका-यांवर दुहेरी कार्यभार दिला जात आहे. त्यामुळे अधिकारी अधिकच त्रस्त असून, आयुक्तांनी आकृतिबंधाचा विषय निकाली काढावा, अशी मागणी होऊ लागली आहे.

महापालिकेत अधिकारी आणि कर्मचा-यांची संख्या पूर्वी सात हजारावर होती, मात्र आता ती पाच हजारांच्या खाली आली आहे. दर महिन्याला पाच ते सहा कर्मचारी आणि अधिकारी निवृत्त होत आहेत. मात्र, महापालिकेत भरती पूर्णत: बंद आहे. गेल्या दीड ते दोन वर्षांपासून महापालिकेचा आकृतिबंध शासनाकडे मंजुरीसाठी प्रलंबित असून किमान रिक्त झालेली पदे भरण्यास परवानगी द्यावी, असा लकडा प्रशासनाने लावूनदेखील त्याचा काहीच उपयोग झालेला नाही.
महापालिकेचे विभागीय अधिकारीपद हे अतांत्रिक असून, प्रशासकीय स्वरूपाचे आहे. मात्र सर्व पदांवर अभियंते नियुक्त करण्यात आले आहेत. यात (कै.) अनिल नरसिंगे (पश्चिम), नितीन राजपूत (सातपूर), रवींद्र धारणकर (नाशिक पूर्व) आणि पालवे (नाशिकरोड) असे सहा पैकी पाच अधिकारी हे मुळात अभियंता असताना त्यांच्याकडे अतिरिक्त जबाबदारी सोपविण्यात आली आहे. अधिकाºयांची टंचाई असताना दुसरीकडे प्रशांत पगार नामक अभियंत्याला पुण्याला महानगर विकास प्राधिकरणात प्रतिनियुक्तीवर परवानगी देण्यात आली आहे. स्थानिक अधिकाºयांवर अनेक कामांचा भार असताना मुख्याधिकारी संवर्गातील जे अधिकारी महापालिकेत प्रतिनियुक्तीवर आले त्यांना क्षेत्रीय विभागीय अधिकाºयाचे काम न देता केवळ मुख्यालयातच काम देण्यात आल्यानेदेखील नाराजी व्यक्त केली जात आहे. महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे हे रजेवरून परतल्यानंतर कर्मचारी संघटना आणि पदाधिकारी त्यांची भेट घेऊन भरतीसाठी साकडे घालणार आहे.