लोकहितवादी मंडळाच्या अध्यक्षपदी जातेगावकर यांची फेरनिवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 04:12 AM2021-01-04T04:12:26+5:302021-01-04T04:12:26+5:30
नाशिक : लोकहितवादी मंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ज्येष्ठ सभासद जयप्रकाश जातेगावकर यांची फेरनिवड करण्यात आली. मंडळाच्या अध्यक्षपदाची निवड करण्यात ...
नाशिक : लोकहितवादी मंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ज्येष्ठ सभासद जयप्रकाश जातेगावकर यांची फेरनिवड करण्यात आली.
मंडळाच्या अध्यक्षपदाची निवड करण्यात आली. जयप्रकाश जातेगावकर यांची नेमणूक झाल्यानंतर त्यांनी कार्यकारिणी जाहीर केली. विश्वस्तपदी हेमंत टकले, दिलीप साळवेकर, लोकेश शेवडे, रमेश देशमुख, लक्ष्मण सावजी, तर कार्याध्यक्षपदी मुकुंद कुलकर्णी, उपाध्यक्ष भगवान हिरे, सी.एल. कुलकर्णी, सरचिटणीस सुभाष पाटील, सहचिटणीस किरण समेळ, सुनील भुरे, खजिनदार चंद्रकांत दीक्षित, कार्यकारिणी सदस्य अपूर्वा शौचे, मुक्ता बालिगा, सागर संत, सागर पाटील, संजय करंजकर, शंकर बोऱ्हाडे, निमंत्रित सदस्य श्याम पाडेकर, जयेश आपटे, मुक्तेश्वर मुनशेट्टीवार, रमेश काळे, निर्मल अष्टपुत्रे, राका कॉलनीतील नागरिक, सन्माननीय नगरसेवक तर सल्लागार समितीवर डॉ. कैलास कमोद, गुरुमीत बग्गा यांचा समावेश करण्यात आला आहे.