क्रेडाई नाशिक मेट्रोच्या अध्यक्षपदी रवि महाजन यांची फेरनिवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:15 AM2021-04-02T04:15:25+5:302021-04-02T04:15:25+5:30

क्रेडाई नाशिक मेट्रोचे माजी अध्यक्ष तसेच राष्ट्रीय क्रेडाईचे उपाध्यक्ष अनंत राजेगावकर व राष्ट्रीय क्रेडाईच्या घटना सल्लागार ...

Re-election of Ravi Mahajan as President of Credai Nashik Metro | क्रेडाई नाशिक मेट्रोच्या अध्यक्षपदी रवि महाजन यांची फेरनिवड

क्रेडाई नाशिक मेट्रोच्या अध्यक्षपदी रवि महाजन यांची फेरनिवड

Next

क्रेडाई नाशिक मेट्रोचे माजी अध्यक्ष तसेच राष्ट्रीय क्रेडाईचे उपाध्यक्ष अनंत राजेगावकर व राष्ट्रीय क्रेडाईच्या घटना सल्लागार समितीचे प्रमुख जितुभाई ठक्कर तसेच अन्य माजी अध्यक्ष यांच्या समितीने ही निवड केली.

गत वर्षात अध्यक्ष रवि महाजन यांच्या नेतृत्वाखाली कोविडच्या संकटकाळात क्रेडाई नाशिक मेट्रोतर्फे शहरामध्ये अनेक समाजोपयोगी उपक्रम हाती घेण्यात आले होते. बांधकाम व्यावसायिकांसाठी युनिफाइड डीसीपीआर लागू करण्यात आल्याने त्यासंदर्भात प्रशिक्षण कार्यक्रमदेखील रवि महाजन यांनी आयोजित केला होता.

निवडीनंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना महाजन यांनी विकसित करण्यासाठी शासन तसेच लोकप्रतिनिधी यांच्या सहकार्याने विविध उपक्रम राबविण्याचा मानस व्यक्त केला आहे. तसेच नाशिकमध्ये नवे उद्योग व गुंतवणूक येण्यासाठीदेखील क्रेडाई नाशिक मेट्रोतर्फे प्रयत्न केले जातील. शहराचे ब्रांडिंग व सौंदर्यवृद्धीसाठी क्रेडाई नाशिक मेट्रो विशेष प्रयत्न करणार असल्याचेदेखील त्यांनी नमूद केले.

क्रेडाई महाराष्ट्रचे सचिव सुनील कोतवाल यांनी नूतन कार्यकारिणीस मार्गदर्शन करताना ही कार्यकारिणी नाशिकच्या विकासात सकारात्मक योगदान देईल, असा विश्वास व्यक्त केला.

इन्फो...

क्रेडाई नाशिक मेट्रोची कार्यकारिणी अशी

अध्यक्ष- रवि महाजन, माजी अध्यक्ष- उमेश वानखेडे, उपाध्यक्ष- नरेश कारडा व कृणाल पाटील, मानद सचिव- गौरव ठक्कर, सहसचिव- अनिल आहेर व सचिन बागड, कार्यकारिणी सदस्य- मनोज खिवंसरा, अंजन भालोदिया, अतुल शिंदे, सुशील बागड, राजेश आहेर, हंसराज देशमुख, श्रेणिक सुराणा, निमंत्रित सदस्य- नरेंद्र कुलकर्णी, सागर शाह, अनंत ठाकरे, विजय चव्हाणके.

(रवि महाजन यांचे संग्रहीत छायाचित्र वापरावे)

Web Title: Re-election of Ravi Mahajan as President of Credai Nashik Metro

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.