गोदाघाट भाजीबाजारात पुन्हा अतिक्र मण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2018 11:28 PM2018-12-30T23:28:06+5:302018-12-31T00:42:53+5:30
महापालिकेच्या अतिक्र मण विभागाने गंगाघाटावरील भाजीबाजार हटविलेला असला तरी पुन्हा काही भाजीविक्रे त्यांनी पूर्वीच्या जागी भाजीपाला विक्र ीचा व्यवसाय सुरू करून अतिक्र मण केले आहे.
पंचवटी : महापालिकेच्या अतिक्र मण विभागाने गंगाघाटावरील भाजीबाजार हटविलेला असला तरी पुन्हा काही भाजीविक्रे त्यांनी पूर्वीच्या जागी भाजीपाला विक्र ीचा व्यवसाय सुरू करून अतिक्र मण केले आहे. भाजीविक्रे त्यांचे जाळे वाढत चालल्याने आगामी कालावधीत महापालिकेची डोकेदुखी पुन्हा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कालावधीत येणाऱ्या भाविकांना अडथळा होऊ नये, यासाठी महापालिका प्रशासनाने गंगाघाट परिसरात भरणारा भाजीबाजार हटविला होता. भाजीबाजार हटविल्याने या जागेवरून मोठा वाद निर्माण झालेला होता. सदर जागेबाबत न्यायालयात प्रकरण प्रलंबित असले तरी काही विक्रे त्यांनी कमानीच्या बाजूला पूर्वीप्रमाणेच भाजीपाला विक्र ीचा व्यवसाय सुरू केला आहे. भाजीविक्रे त्यांचे अतिक्र मण वाढू नये, यासाठी महापालिका प्रशासनाने सुरु वातीला अतिक्र मण विभागाचे पथक परिसरात नेमले होते. मात्र या पथकाने आता पाठ फिरविल्याने पुनश्च भाजीविक्रे त्यांनी अतिक्रमण केल्याचे दिसून येते. त्यामुळे या भागात रहदारीस नेहमीच अडथळा निर्माण होत आहे.
मनपाकडून कारवाई नाही
विशेष म्हणजे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून कारवाई केली जात नसल्याने गंगाघाटावर भाजीविक्रे त्यांचे अतिक्र मण वाढत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.