परीक्षेस अनुपस्थित विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:11 AM2021-06-29T04:11:50+5:302021-06-29T04:11:50+5:30

नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांकरिता विद्यापीठाकडून महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून, विद्यापीठाच्या हिवाळी-२०२० ...

Re-examination of students absent from the examination | परीक्षेस अनुपस्थित विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा

परीक्षेस अनुपस्थित विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा

Next

नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांकरिता विद्यापीठाकडून महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून, विद्यापीठाच्या हिवाळी-२०२० सत्रातील पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षेस अनुपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा घेण्यात येणार असल्याचे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.

विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक यांनी दिलेल्या माहितीनुसार, पूर्वनियोजित परीक्षा कालावधीदरम्यान कोविड-१९ अहवाल पॉझिटिव्ह आलेले विद्यार्थी अथवा कोविड महामारीच्या कारणाने अनुपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांची विद्यापीठाकडून विशेष लेखी पुनर्परीक्षा घेण्यात येणार असून, ही लेखी परीक्षा दि. ३० जुलै ते दि. १७ ऑगस्ट २०२१ या कालावधीत होणार आहे. न्यायालयाच्या आदेशान्वये व शासनाने कोविड-१९ संदर्भात निर्देशित केलेल्या सुरक्षा नियमांचे पालन करीत ही परीक्षा घेण्यात येणार असून, विद्यापीठाकडून घेण्यात येणाऱ्या पुनर्परीक्षेसाठी राज्यात एकूण ८६ परीक्षा केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. यासाठी केंद्रनिरीक्षक, केंद्रप्रमुख, कनिष्ठ व वरिष्ठ पर्यवेक्षक, भरारी पथक यांची विद्यापीठाकडून नियुक्ती करण्यात आली आहे. कोविड-१९ अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे जे विद्यार्थी हिवाळी २०२० सत्रातील प्रात्यक्षिक परीक्षेला मुकले किंवा मुकणार आहेत, अशा विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक परीक्षा त्याच परीक्षा केंद्रावर त्यांचा विलगीकरण कालावधी समाप्त झाल्यानंतर घेण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे विविध विद्याशाखांची हिवाळी-२०२० सत्राच्या लेखी परीक्षेसही सुरुवात झाली असून, विद्यापीठाकडून पदवी अभ्यासक्रमासाठी सर्व विद्याशाखांच्या प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षाच्या लेखी परीक्षा घेण्यात येत आहेत. तसेच सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्माकॉलॉजी व मॉडर्न मिड लेव्हल सर्व्हिस प्रोव्हायडर कोर्स या पदविका अभ्यासक्रमांच्याही परीक्षा घेण्यात येत आहेत. याविषयी सविस्तर माहिती विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. विशेष परीक्षेचे वेळापत्रकही लवकर संकेतस्थळावर प्रसिद्ध होणार आहे.

Web Title: Re-examination of students absent from the examination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.