कांदा उत्पादकांच्या अडचणीत पुन्हा वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:09 AM2021-05-03T04:09:42+5:302021-05-03T04:09:42+5:30
गेले दोन-तीन दिवस ढगाळ वातावरण होते. हवेत कमालीचा उकाडा असून पाऊस झाला नाही. पण शुक्रवारी संध्याकाळच्या सुमारास वातावरणात अचानक ...
गेले दोन-तीन दिवस ढगाळ वातावरण होते. हवेत कमालीचा उकाडा असून पाऊस झाला नाही. पण शुक्रवारी संध्याकाळच्या सुमारास वातावरणात अचानक बदल होऊन लासलगावसह परिसरातील गावात विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. दुपारपर्यंत कडक ऊन होते. अचानक आलेल्या पावसाने बळीराजाची काढलेला शेतीमाल झाकण्यासाठी एकच धावपळ उडाली. शेतात उभे असलेले पीक आणि ठिकठिकाणी सध्या कांद्याची काढणी सुरू आहे. अचानक पाऊस सुरू झाल्याने तीन ते चार महिने सांभाळलेली पिके डोळ्यादेखत ओली झाल्याने मोठे नुकसान झाले आहे. यामुळे आता कांद्याच्या पिकाची प्रतवारी घसरणार असून उत्पादन खर्चही निघणे मुश्कील होणार आहे. कोरोना महामारी सुरू असल्याने कांद्याला मागणी घटली आहे. त्यामुळे कांद्याच्या बाजार भावात कमालीची दररोज घसरण होत आहे. त्यामुळे कुटुंब चालवावे कसे असा प्रश्न आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडे केंद्र व राज्य सरकारने लक्ष देण्याची मागणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे
===Photopath===
020521\02nsk_18_02052021_13.jpg
===Caption===
लासलगाव येथे सुरु असलेली कांद्याची काढणी