मालेगावी बाधितांच्या संख्येत पुन्हा वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2020 09:41 PM2020-06-04T21:41:29+5:302020-06-05T00:34:41+5:30
मालेगाव : शहरात कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन तुलनेने संख्या घटत असताना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. बुधवारी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास १५ आणि साडेदहा वाजेच्या सुमारास ३ असे १८ बाधित रुग्ण मिळून आले. गुरुवारी दुपारी पुन्हा १४ बाधित मिळून आल्याने शहरात घबराट पसरली आहे.

आता कोरोनाचे रुग्ण पश्चिम भागात मोठ्या संख्येने मिळून येत असल्याने चिंता व्यक्त होत आहे. गुरुवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास ६८ जणांचे तपासणी अहवाल आले. यात ५४ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. १४ जणांमध्ये मालेगाव कॅम्पातील समर्थ कॉलनीतील सात रुग्ण आहेत. त्यात ५० वर्षीय पुरुष, ६५ वृद्ध, ७ आणि २ वर्षीय मुले, ५९ वर्षांची महिला आणि १६ वर्षांच्या मुलीचा समावेश आहे.
याखेरीज संजरी चौक भागातील ६० वर्षांची महिला, द्यानेतील ५५ वर्षीय पुरुष, ओझरचा २३ वर्षीय पुरुष, ४७ वर्षीय पारोळा, जि. जळगावची महिला, येवला येथील पुरुष वय ३६ आणि मुंबईच्या मुलुंड येथील ४६ वर्षीय पुरुष आणि ३६ वर्षांची महिला यांचा समावेश
आहे.