आरोग्य विद्यापीठाच्या परीक्षांबाबत सादर होणार फेरप्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:14 AM2021-05-16T04:14:40+5:302021-05-16T04:14:40+5:30

नाशिक : कोविड-१९च्या पार्श्वभूमीवर राज्यातील कडक निर्बंध दि. १ जूनपर्यंत वाढविण्यात आल्याने आरोग्य विद्यापीठाच्या विविध विद्याशाखांच्या दि. २ ...

A re-proposal will be submitted regarding health university examinations | आरोग्य विद्यापीठाच्या परीक्षांबाबत सादर होणार फेरप्रस्ताव

आरोग्य विद्यापीठाच्या परीक्षांबाबत सादर होणार फेरप्रस्ताव

Next

नाशिक : कोविड-१९च्या पार्श्वभूमीवर राज्यातील कडक निर्बंध दि. १ जूनपर्यंत वाढविण्यात आल्याने आरोग्य विद्यापीठाच्या विविध विद्याशाखांच्या दि. २ जूनपासून सुरू होणाऱ्या परीक्षांबाबत चर्चा करून फेरप्रस्ताव शासनास पाठवावा, असे निर्देश विद्यापीठाचे प्रति-कुलपती तथा वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी दिले आहेत. त्यामुळे विद्यापीठाकडून शासनाला सुधारित प्रस्ताव सादर होणार असून, त्यामुळे परीक्षांच्या पूर्वनियोजित वेळापत्रकात बदल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (दि.१४) परीक्षांच्या वेळापत्रकांबाबत आढावा बैठक ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आली. या बैठकीत महाराष्ट्रातील कोविडविषयक सध्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्यात लागू असलेले कडक निर्बंध लक्षात घेत परीक्षेच्या नियोजन संदर्भामध्ये तसेच वेळापत्रकासंदर्भात फेरप्रस्ताव शासनास सादर करण्याचे निर्देश अमित देशमुख यांनी दिले. यापूर्वी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या दि. २ जून २०२१पासून विविध विद्याशाखांच्या हिवाळी-२०२० पदवी परीक्षा विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत घेण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला होता. परंंतु, बैठकीत अमित देशमुख यांनी फेरप्रस्ताव सादर करण्याच्या सूचना केल्याने पूर्वनियोजित वेळापत्रकात बदल होण्याच्या शक्यता निर्माण झाल्या आहेत. या बैठकीस वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाचे सचिव विजय सौरभ, विद्यापीठाचे प्रभारी-कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने, सहसंचालक डॉ. अजय चंदनवाले, कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण, परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक विद्यापीठाचे विद्याशाखांचे अधिष्ठाता डॉ. सचिन मुंबरे, डॉ. जयंत पळसकर, डॉ. श्रीकांत देशमुख, डॉ. धनाजी बागल, डॉ. राजश्री नाईक बैठकीस उपस्थित होते.

इन्फो-

उन्हाळी-२०२१ पदव्युत्तर परीक्षांचे प्रस्ताव सादर होणार

पदव्युत्तर वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या उन्हाळी-२०२१ परीक्षा २४ जून २०२१ पासून नियोजित होत्या. या परीक्षा आधिच प्रशासकीय कारणांमुळे पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत. त्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर होणे आवश्यक असल्याने परीक्षांच्या वेळापत्रकाबाबत सर्व संबंधितांनी शासनाला प्रस्ताव प्रस्ताव शासनास सादर करण्याच्या सूचना वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ प्रशासनाला दिले आहेत.

Web Title: A re-proposal will be submitted regarding health university examinations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.