ट्रॅव्हल्सचे चाक पुन्हा पंक्चर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:13 AM2021-03-22T04:13:54+5:302021-03-22T04:13:54+5:30
नाशिक शहरातून राज्यातील मुंबई, पुणे, औरंगाबाद व नागपूर यासारख्या महत्वाच्या शहरांसोबतच कोल्हापूर, सोलापूर, उस्मानाबाद लातूर, नांदेड, अमरावती अकोला, ...
नाशिक शहरातून राज्यातील मुंबई, पुणे, औरंगाबाद व नागपूर यासारख्या महत्वाच्या शहरांसोबतच कोल्हापूर, सोलापूर, उस्मानाबाद लातूर, नांदेड, अमरावती अकोला, बुलडाणा यासराख्या विविध शहरांमध्ये तसेच राज्याबाहेरील इंदूर, हैद्राबाद, सुरत. उस्मानाबाद, राजकोट जैसलमेर, जोधपूर यासारख्या शहरांमध्ये प्रवासी बसद्वारे प्रवास करणाऱ्या नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने नाशिकमधून सुमारे अडीचशे प्रवासी बस यातील विविध मार्गांवर चालतात. मात्र कोरोनामुळे संख्याच घटली असून त्यामुळे सध्या अडीचशेऐवजी केवळ शंभर प्रवासी बस सुरू असून त्यातूनही केवळ ५० टक्के क्षमतेनेच वाहतूक सुरू असल्याने व्यवसायाला मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे.
कोट-१
सध्या कोरोनामुळे मध्यप्रदेश, भोपाळ, इंदूरसारख्या शहरांमध्ये महाराष्ट्रातील वाहनांना सहजरीत्या प्रवेश दिला जात नाही. प्रवाशांना कोरोना बाधा नसल्याचा वैद्यकीय अहवाल अनिवार्य केल्याने या मार्गावरील प्रवासी संख्या अत्यल्प आहे. त्याचप्रमाणे राज्यातील प्रवासी संख्याही घटली आहे. त्यामुळे व्यावसायाला मोठा फटका बसला असून केवळ ४० टक्के व्यावसाय होत असल्याने ट्रॅव्हल्स व्यावसायिक संकटात सापडले आहे.
- दिलीपसिंग बेनिवाल, अध्यक्ष, नाशिक ट्रॅव्हल्स संघटना
कोट-२
कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात चार महिने व्यावसाय ठप्प राहिल्यानंतर नोव्हेंबर , डिसेंबर, जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात व्यावसाय पूर्वपदावर येऊ लागला होता. मात्र आता पुन्हा रुग्ण संख्या वाढू लागल्याने परराज्यात महाराष्ट्रातील बसेसवर निर्बंध आले असून प्रवासी संख्याही घटली आहे. त्यामुळे व्यावसाय पुन्हा संकटात आला आहे.
-प्रेम सोनेजी , ट्रॅव्हल्स व्यावसायिक
कोट-३
कोरोनामुळे सरकारने पुन्हा निर्बंध लाग केले असून प्रवाशांमध्येही भितीचे वातावरण निर्माण झाल्याने प्रवाशी वाहतुकीवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला असून व्यावसाय संकटात आला आहे. राज्यातील विविध शहरांमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे.
-रमेश दायमा ट्रॅव्हल्स व्यावसायिक
पॉइंटर -
कोरोनापूर्वी बाहरगावी जाणाऱ्या ट्रॅव्हल्सची संख्या -२५०
सध्याची संख्या - १००
व्यावसायाला दहा कोटींचा फटका
कोरोनाच्या काळात सुरुवातीला चार महिने टाळेबंदीनंतर ट्रॅव्हल्स व्यावसाय सप्टेंबर , ऑक्टोबर मध्ये हळुहळू सुरू झाल्यानंतर नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारीमध्ये व्यावसाय पूर्वपदावर येत असताना मार्चमध्ये पुन्हा रुग्णसंख्या वाढली आहे. त्यामुळे सरकारने पुन्हा निर्बंध लागू केल्याने व्यावसायिक संकटात आले आहे. कोरोनामुळे गेल्या वर्षभराच्या कालावधील ट्रॅव्हल्स व्यावसायिकांना जवळपास दहा कोटींचा फटका सहन करावा लागल्याची माहिची व्यावसायिकांनी दिली .