बार्डे शिवारात बिबट्याचा पुन्हा संचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2020 04:45 PM2020-09-17T16:45:18+5:302020-09-17T16:45:55+5:30
अभोणा : बार्डे, गोसराणे शिवारातील पंडीत रामभाऊ वाघ यांचे शेतातील घराजवळ लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात मंगळवारी (दि.१६) मध्यरात्री दोनचे सुमारास एका नविन बिबट्याचा थरार कैद झाला आहे.
अभोणा : बार्डे, गोसराणे शिवारातील पंडीत रामभाऊ वाघ यांचे शेतातील घराजवळ लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात
मंगळवारी (दि.१६) मध्यरात्री दोनचे सुमारास एका नविन बिबट्याचा थरार कैद झाला आहे. मागील आठवड्यात सोमवारी (दि.७) वाघ यांच्या घराजवळ कनाशी वन विभागाने लावलेल्या पिंजºयात तब्बल दिड महिने हुलकावणी देत शिवारातील शेतकरी, नागरिकांचा जीव टांगणीला लावणारा बिबट्या जेरबंद झाल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा नि:स्वास सोडला होता. मात्र या नविन बिबट्याच्या दर्शनाने शिवारात पुन्हा भितीचे सावट वाढले आहे.
बिबट्याने गोठ्या भोवती असलेल्या सातफुटी संरक्षक जाळीवरून उडी घेत गोठ्यातील गाईवर जोरदार हल्ला केला. मात्र गाईची जीव वाचविण्याची धडपड बघून तेथून पळ काढत कुत्र्याची शिकार करून त्याला उचलून नेल्याचे दृष्य सीसीटीव्हीत कैद झाले आहे. याआधीही शिवारातील विश्वास मोरे, किशोर वाघ, बळीराम मोरे या शेतकऱ्यांच्या शेतात बिबट्यांचा वावर सीसीटीव्हीत कैद झाला आहे.