वार्षिक सभेकडे शेतकºयांची पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2017 12:11 AM2017-09-26T00:11:15+5:302017-09-26T00:11:21+5:30
येथील बाजार समितीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेकडे काही संचालकांसह शेतकºयांनी पाठ फिरवल्याने अवघ्या पंधरा मिनिटातच सभा गुंडाळावी लागली. प्रशासनावर आलेली ही नामुष्की सध्या चर्चा विषय बनला आहे. विभाजनानंतर सटाणा व नामपूर स्वतंत्र बाजार समित्या झाल्या. त्यानंतर येथील बाजार समिती आवारात दुसरी वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित केली होती. सुमारे ७६ गावांचे कार्यक्षेत्र असलेल्या या बाजार समितीत दररोज शेकडो शेतकरी शेतमाल विक्रीसाठी आणत असल्यामुळे लाखो रु पयांची उलाढाल होत असते. शेतकºयांशी निगडित ही संस्था असल्यामुळे साहजिकच सर्वाधिक समस्या शेतकºयांनाच भेडसावत असतात. असे असताना प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे या सभेकडे शेतकºयांनी पाठ फिरविल्याचे चित्र बघायला मिळाले. यामुळे ही सभा पंधरा मिनिटात गुंडाळावी लागली.
सटाणा : येथील बाजार समितीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेकडे काही संचालकांसह शेतकºयांनी पाठ फिरवल्याने अवघ्या पंधरा मिनिटातच सभा गुंडाळावी लागली. प्रशासनावर आलेली ही नामुष्की सध्या चर्चा विषय बनला आहे.
विभाजनानंतर सटाणा व नामपूर स्वतंत्र बाजार समित्या झाल्या. त्यानंतर येथील बाजार समिती आवारात दुसरी वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित केली होती. सुमारे ७६ गावांचे कार्यक्षेत्र असलेल्या या बाजार समितीत दररोज शेकडो शेतकरी शेतमाल विक्रीसाठी आणत असल्यामुळे लाखो रु पयांची उलाढाल होत असते. शेतकºयांशी निगडित ही संस्था असल्यामुळे साहजिकच सर्वाधिक समस्या शेतकºयांनाच भेडसावत असतात. असे असताना प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे या सभेकडे शेतकºयांनी पाठ फिरविल्याचे चित्र बघायला मिळाले. यामुळे ही सभा पंधरा मिनिटात गुंडाळावी लागली. सभापती देवरे यांचे भाषण आणि सचिव भास्करराव तांबे यांच्या इतिवृत्त वाचनाचे सोपस्कार पार पाडून सभा आटोपती घ्यावी लागली. सभेस साहेबराव सोनवणे, लालचंद सोनवणे, साधना गवळी, शरद शेवाळे, कारभारी पगार, अतुल पवार, जिभाऊ मोरकर, किरण अहिरे, राहुल सोनवणे, वसंतराव सोनवणे, दिलीप सोनवणे यांच्यासह शैलेश सूर्यवंशी, श्रीधर कोठावदे, संजय वाघ, भिका सोनवणे, किशोर गहिवड, राजेंद्र बडजाते आदी उपस्थित होते.