आधारलिंक नसलेल्या शेतकऱ्यांचे बॅँक खात्यांचे चावडी वाचन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2020 08:04 PM2020-01-01T20:04:28+5:302020-01-01T20:05:51+5:30
जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी शेतकरी कर्जमाफीसंदर्भात माने यांनी महसूल व सहकार खात्याच्या अधिका-यांची बैठक घेतली. त्यात त्यांनी शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत ज्या कर्जदार शेतक-यांची बँक खात्यांशी आधारलिंक झालेली नाही अशा खातेदारांची यादी
लोकमत न्युज नेटवर्क
नाशिक : महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना लागू करण्यात आली असून, या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचे दोन लाखापर्यंतचे कर्ज माफ करण्यात येणार आहे. या कर्जमाफीसाठी शेतक-याचे प्रत्येक बँक खाते हे आधार क्रमांकासोबत जोडणी झालेले असणे अत्यावश्यक असल्याने तशी जोडणी झाली नसल्यास संबंधित शेतक-यांच्या यादीचे चावडी वाचन करण्यात यावे, अशा सूचना विभागीय आयुक्त राजाराम माने यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी शेतकरी कर्जमाफीसंदर्भात माने यांनी महसूल व सहकार खात्याच्या अधिका-यांची बैठक घेतली. त्यात त्यांनी शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत ज्या कर्जदार शेतक-यांची बँक खात्यांशी आधारलिंक झालेली नाही अशा खातेदारांची यादी ७ जानेवारीपूर्वी बँक शाखा, विविध कार्यकारी सोसायटी, गावचावडी या ठिकाणी प्रकाशित करण्यात यावी. तसेच या योजनेच्या प्रचार व प्रसिद्धीसाठी मेळावे, शिबिरे, दवंडी देणे, समाज माध्यमांचा उपयोग करावा अशा सूचना दिल्या. ज्या शेतकºयांनी १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ या कालावधीत कर्ज उचलले आहे, असे शेतकरी या कर्जमाफीसाठी पात्र ठरणार आहेत. कर्जधारक शेतक-यांना महात्मा फुले शेतकरी कर्ज मुक्ती योजनेचा लाभ मिळण्यासाठी या योजनेअंतर्गत वैयक्तिक शेतक-यांच्या सर्व कर्जखात्यांची ३० सप्टेंबर २०१९ रोजी एकत्रित थकबाकीची रक्कम विचारात घेऊन प्रतिशेतकरी रुपये दोन लाख मर्यादेपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येणार आहे. या बैठकीस जिल्हाधिकारी सूरज मांढरे, उपायुक्त दिलीप स्वामी, अपर जिल्हाधिकारी नीलेश सागर, निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाणे तसेच सहायक निबंधक, राष्ट्रीयीकृत बँकांचे प्रतिनिधी, लीड बँकेचे अधिकारी आदी उपस्थित होते.