चौदाव्या वित्त आयोगाच्या बैठकीकडे अधिकाºयांची पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 12:38 PM2018-03-13T12:38:18+5:302018-03-13T12:38:18+5:30
नांदगाव- ग्रामपंचायतीच्या विकासाकरिता शासनाने चौदाव्या वित्त आयोगाची स्थापना केली असून लोकसंख्येच्या प्रमाणात गावातला निधी उपलब्ध केला जातो, परंतु या महत्त्वाकांक्षी योजनेच्या बैठकीकडे अधिकार्यांसह जनतेने पाठ फिरविली .
नांदगाव- ग्रामपंचायतीच्या विकासाकरिता शासनाने चौदाव्या वित्त आयोगाची स्थापना केली असून लोकसंख्येच्या प्रमाणात गावातला निधी उपलब्ध केला जातो, परंतु या महत्त्वाकांक्षी योजनेच्या बैठकीकडे अधिकार्यांसह जनतेने पाठ फिरविली . गावाच्या विकासात सर्वांचे योगदान असावे हा या मागील व्यापक दृष्टिकोन आहे मात्र सामान्य जनतेने अधिकाºयांनी याकडे सर्रास पाठ फिरवल्याचे दिसून आले. चौदावा वित्त आयोग ही सरकारची योजना म्हणजे गावाच्या विकासाकरिता उपलब्ध होणारी निधी हा थेट ग्रामपंचायतीच्या खात्यात वर्ग होत असून निधी प्राप्ती व खर्चा करिता येणाºया अडचणी यावर मात करावी लागत आहे. शासनाच्या महत्वाकांक्षी निर्णयाला मात्र अधिकारी वर्गाकडून व सामान्य जनतेकडून प्रतिसाद नाममात्र मिळत आहे.यामुळे गावाच्या विकासात सर्वांचा सहभाग व सर्वांच्या सहमती तून विकास ही योजन फोल ठरताना दिसते या बैठकीची व्यापक प्रसिद्धी ही प्रशासनाकडून झाली नसल्याचे बोलले जात आहे
या बैठकीस जिल्हा परिषद सदस्य सुनीता पठाडे, सरपंच ज्ञानेश्वर नवले उपसरपंच शुभांगी कायस्थ, जिल्हा परिषद शाळा बोलठाणचे मुख्याध्यापक सूर्यवंशी, अमित नहार, चंद्रभान जाधव, ग्रामसेवक अतुल सोनवणे, मॅचिंदर पठाडे, अनिल कायस्थ, गणेश शिंदे उपस्थित होते. चौदावा वित्त आयोग कार्यशाळाचे प्रशिक्षक आबा रिंढे यांनी कृती आराखड्याबाबत माहिती दिली.