वाचन संस्कृती वाढवावी - प्रा. पाचोरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:18 AM2021-09-15T04:18:38+5:302021-09-15T04:18:38+5:30

सिन्नर : पुस्तक वाचनामुळे ज्ञानात भर पडते. जीवन संस्कारक्षम व सुसंस्कृत बनते. पुस्तकांना मित्र बनवून प्रत्येकाने नेहमी वाचन करावे. ...

Reading culture should be increased - Pvt. Pachore | वाचन संस्कृती वाढवावी - प्रा. पाचोरे

वाचन संस्कृती वाढवावी - प्रा. पाचोरे

Next

सिन्नर : पुस्तक वाचनामुळे ज्ञानात भर पडते. जीवन संस्कारक्षम व सुसंस्कृत बनते. पुस्तकांना मित्र बनवून प्रत्येकाने नेहमी वाचन करावे. वाचन संस्कृती वाढवावी, असे आवाहन प्रा. शहाजी पाचोरे यांनी केले.

पाडळी येथे पाताळेश्वर विद्यालयात ‘वाचन संस्कृती’ या विषयावर व्याख्यान झाले. यावेळी ते बोलत होते. वाढदिवसानिमित्त विद्यार्थी विद्यालयास पुस्तक भेट देतात, तसेच लॉकडाऊन काळात शिक्षकांनी वाड्या-वस्त्यांवर जावून विद्यार्थ्यांना वाचनालयातील पुस्तके वाचनास दिल्याचे त्यांनी कौतुक केले. मुख्याध्यापक एस. बी. देशमुख यांनी परिचय करून दिला. यावेळी बी. आर. चव्हाण, आर. व्ही. निकम, एस. एम. कोटकर, आर. टी. गिरी, एम. सी. शिंगोटे, एम. एम. शेख, एस. एस. देशमुख, टी. के. रेवगडे, के. डी. गांगुर्डे, सी. बी. शिंदे, एस. दि. पाटोळे आदी उपस्थित होते.

फोटो - १४ पाडळी१

पाडळी येथील पाताळेश्वर विद्यालयात ‘वाचन संस्कृती’ व्याख्यानात बोलताना प्रा. शहाजी पाचोरे. समवेत शिक्षकवृंद.

140921\14nsk_35_14092021_13.jpg

पाडळी येथील पाताळेश्वर विद्यालयात ‘वाचन संस्कृती’ व्याख्यानात बोलताना प्रा. शहाजी पाचोरे. समवेत शिक्षकवृंद.

Web Title: Reading culture should be increased - Pvt. Pachore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.