जीवनात वाचन संस्कार महत्त्वाचे : सुषमा पौडवाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2018 12:19 AM2018-05-13T00:19:03+5:302018-05-13T00:19:03+5:30
पैठणीवर मोर असो वा पोपट तो बनविण्यासाठी वेगवेगळ्या रंगांचे पदर एकत्र येतात़ यासारखेच वाचन या विषयाचेही वेगवेगळे पदर असून, वाचन हा एक संस्कार असल्याचे प्रतिपादन डॉ़ सुषमा पौडवाल यांनी केले़ यशवंत महाराज देवमामलेदार पटांगणावरील वसंत व्याख्यानमालेचे बारावे पुष्प ‘वाचन संस्कार व संस्कृती : काल-आज-उद्या’ या विषयावर त्यांनी गुंफले़
नाशिक : पैठणीवर मोर असो वा पोपट तो बनविण्यासाठी वेगवेगळ्या रंगांचे पदर एकत्र येतात़ यासारखेच वाचन या विषयाचेही वेगवेगळे पदर असून, वाचन हा एक संस्कार असल्याचे प्रतिपादन डॉ़ सुषमा पौडवाल यांनी केले़ यशवंत महाराज देवमामलेदार पटांगणावरील वसंत व्याख्यानमालेचे बारावे पुष्प ‘वाचन संस्कार व संस्कृती : काल-आज-उद्या’ या विषयावर त्यांनी गुंफले़ स्व़ निर्मलाताई दातार स्मृती व्याख्यानात बोलताना पौडवाल पुढे म्हणाल्या की, वाचन हा एक संस्कार असून, त्याचे वेगवेगळे प्रकार आहेत़ आमच्या लहानपणी एकत्र कुटुंबपद्धती अस्तित्वात होती तसेच त्याकाळी टीव्हीदेखील नव्हता़ तेव्हा घरातील आजी संस्कृतचे श्लोक, ‘उठा उठा चिऊताई’ यासारख्या कविता पाठ करून घ्यायची, कथा सांगायची म्हणजेच एकप्रकारे वाचनाचे संस्कारच करीत असे़ आमच्या महाविद्यालयीन काळात अर्थात टीव्हीचे तुरळक आगमन झाल्यानंतरही उन्हाळ्यातील मे महिना व दिवाळीची सुटी ही खास वाचनासाठीच असायची़ आडगुळं- मडगुळं म्हणणारी आई ही वाचनाचा पायाच घालत असते़ चांगल्या वाचनाचे मूळ हे मार्गदर्शनावर अवलंबून असल्याचे पौडवाल यांनी सांगितले़
श्रीकांत येवलेकर यांनी व्याख्यात्या डॉ़ पौडवाल यांचा परिचय करून दिला़ वसंत व्याख्यानमालेच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते व्याख्यात्यांचा सत्कार करण्यात आला़ व्यासपीठावर श्रीकांत बेणी, मधुकर झेंडे, संगीता बाफणा, बाबासाहेब दातार होते़
आजचे व्याख्यान वक्ते : जयंत नारळीकर, पुणे, विषय : पृथ्वीपलीकडे जीवसृष्टीचा शोध