मुंडे यांच्या अभिवादन सभेकडे आमदारांची पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2018 12:46 AM2018-06-04T00:46:38+5:302018-06-04T00:46:38+5:30

नाशिक : माजी केंद्रीयमंत्री व भाजपाचे राष्टÑीय महासचिव दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या चौथ्या स्मृतिदिनानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या शहर कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या अभिवादन सभेकडे देशात क्रमांक एकचा पक्ष म्हणवून घेणाºया भाजपाच्या शहरातील प्रमुख पदाधिकारी तसेच तिन्ही आमदार व खासदारांनी पाठ फिरविल्याची बाब मुंडे यांना मानणाºया गटाच्या जिव्हारी लागली आहे. मते मागण्यासाठी मुंडे यांच्या नावाचा वापर करणाºयांना आता का त्यांची आठवण आली नाही? असा सवालही केला जात आहे.

 Readings of MLAs to Munde's greetings meeting | मुंडे यांच्या अभिवादन सभेकडे आमदारांची पाठ

मुंडे यांच्या अभिवादन सभेकडे आमदारांची पाठ

Next
ठळक मुद्देमुंडे गट नाराज मोजक्याच पदाधिकाऱ्यांची हजेरी

नाशिक : माजी केंद्रीयमंत्री व भाजपाचे राष्टÑीय महासचिव दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या चौथ्या स्मृतिदिनानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या शहर कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या अभिवादन सभेकडे देशात क्रमांक एकचा पक्ष म्हणवून घेणाºया भाजपाच्या शहरातील प्रमुख पदाधिकारी तसेच तिन्ही आमदार व खासदारांनी पाठ फिरविल्याची बाब मुंडे यांना मानणाºया गटाच्या जिव्हारी लागली आहे. मते मागण्यासाठी मुंडे यांच्या नावाचा वापर करणाºयांना आता का त्यांची आठवण आली नाही? असा सवालही केला जात आहे.
गोपीनाथ मुंडे यांचा नाशिकशी नेहमीच जवळचा संबंध राहिला होता. भाजपातील ओबीसी समाजाला मुंडे हे आपले नेते वाटत असल्याने व स्वत: मुंडे यांनीही राजकीय कारकिर्दीतील ओबीसी पदाधिकारी, कार्यकर्त्यांना नेहमीच न्याय देण्याची भूमिका घेतली होती. नाशिक शहर भाजपात मुंडे यांना मानणारा स्वतंत्र गट अद्यापही अस्तित्वात असून, मुंडे यांनी केलेल्या राजकीय व सामाजिक पेरणीतूनच भाजपाला नाशिक जिल्ह्यात ‘अच्छे दिन’ आले आहेत. शहरात तीन आमदार व एक खासदार कार्यरत असून, महापालिकेत ६६ नगरसेवक आहेत. असे असताना रविवारी सकाळी ११ वाजता शहर भाजपाच्या वतीने पक्षाच्या वसंतस्मृती कार्यालयात स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या चौथ्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी सभेचे आयोजन करण्यात आले होते. प्रत्यक्षात या कार्यक्रमाला भाजपा शहर कार्यकारिणीतील सरचिटणीस उत्तमराव उगले, अरुण शेंदुर्णीकर याप्रमुख पदाधिकारी व पश्चिम मंडळाचे कार्यकर्ते, महिला आघाडीचे मोहिने भगरे वगळता सर्वांनीच पाठ फिरविली. प्रमुख पदाधिकारी तसेच आमदार, खासदार येतील अशी आशा बाळगून जवळपास एकतास वाट पाहण्यात आली. ज्यांनी ११ वाजता कार्यालयात हजेरी लावली, त्यांनी वाट पाहून बाहेरचा रस्ता धरला. अखेर सरचिटणीस उगले यांच्या हस्ते स्व. मुंडे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी उगले यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींना उजाळा देत, मुंडे यांच्या मार्गाने प्रत्येक कार्यकर्त्याने वाटचाल केल्यास हमखास यश प्राप्ती होईल, असे सांगितले. कार्यक्रमास उदय रत्नपारखी, अमित घुगे, नंदकुमार देसाई, विजय पाटील, राम बडोदे, मनोज देवरे, सोमनाथ बोडके, सोनल दराडे, विजय बनसोडे, प्रदीप पाटील, नीलेश महाजन आदी उपस्थित होते. भाजपाच्या लोकप्रतिनिधी व पदाधिकाºयांच्या या उदासीनतेमुळे मुंडे गट नाराज झाला असून, त्याची जोरदार चर्चा पक्ष कार्यकर्त्यांत होऊ लागली आहे.
शहरात असूनही आमदार गायब
स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाकडे पाठ फिरविणारे भाजपाचे तिन्ही आमदार नाशकातच तळ ठोकून असल्याचे उघड झाले आहे. आमदार देवयानी फरांदे यांनी क्रांतिवीर व्ही. एन. नाईक संस्थेने सकाळी आयोजित केलेल्या अभिवादन सभेत स्व. मुंडे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला, परंतु पक्ष कार्यालयातील कार्यक्रमाला गैरहजेरी लावली.
४पक्षाचे शहराध्यक्ष व आमदार बाळासाहेब सानप यांनी कार्यक्रमाला हजेरी लावली नाही, मात्र ‘लोकमत’शी बोलताना त्यांनी आपण हजेरी लावली असे सांगितले, परंतु पक्ष कार्यालयातील कार्यक्रमास लोकमत प्रतिनिधींना ते दिसले नाहीत. आमदार सीमा हिरे यादेखील नाशकातच होत्या, परंतु पक्ष कार्यालयात कार्यक्रमाची आपल्याला माहिती नाही, सरचिटणीसांना विचारून सांगते असे सांगून त्यांनी अनभिज्ञता दर्र्शविली व सामाजिक पेरणीतूनच भाजपाला नाशिक जिल्ह्यात ‘अच्छे दिन’ आले आहेत. शहरात तीन आमदार व एक खासदार कार्यरत असून, महापालिकेत ६६ नगरसेवक आहेत. असे असताना रविवारी सकाळी ११ वाजता शहर भाजपाच्या वतीने पक्षाच्या वसंतस्मृती कार्यालयात स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या चौथ्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी सभेचे आयोजन करण्यात आले होते. प्रत्यक्षात या कार्यक्रमाला भाजपा शहर कार्यकारिणीतील सरचिटणीस उत्तमराव उगले, अरुण शेंदुर्णीकर याप्रमुख पदाधिकारी व पश्चिम मंडळाचे कार्यकर्ते, महिला आघाडीचे मोहिने भगरे वगळता सर्वांनीच पाठ फिरविली. प्रमुख पदाधिकारी तसेच आमदार, खासदार येतील अशी आशा बाळगून जवळपास एकतास वाट पाहण्यात आली. ज्यांनी ११ वाजता कार्यालयात हजेरी लावली, त्यांनी वाट पाहून बाहेरचा रस्ता धरला. अखेर सरचिटणीस उगले यांच्या हस्ते स्व. मुंडे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी उगले यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींना उजाळा देत, मुंडे यांच्या मार्गाने प्रत्येक कार्यकर्त्याने वाटचाल केल्यास हमखास यश प्राप्ती होईल, असे सांगितले. कार्यक्रमास उदय रत्नपारखी, अमित घुगे, नंदकुमार देसाई, विजय पाटील, राम बडोदे, मनोज देवरे, सोमनाथ बोडके, सोनल दराडे, विजय बनसोडे, प्रदीप पाटील, नीलेश महाजन आदी उपस्थित होते. भाजपाच्या लोकप्रतिनिधी व पदाधिकाºयांच्या या उदासीनतेमुळे मुंडे गट नाराज झाला असून, त्याची जोरदार चर्चा पक्ष कार्यकर्त्यांत होऊ लागली आहे.

Web Title:  Readings of MLAs to Munde's greetings meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.