प्रशासकीय यंत्रणा निवडणुकांसाठी सज्ज
By admin | Published: February 20, 2017 01:51 PM2017-02-20T13:51:10+5:302017-02-20T13:51:10+5:30
महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आज विविध ठिकाणाहून साहित्य मतदान केंद्रांवर रवाना करण्यात आले.
Next
>ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. 20 - महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आज विविध ठिकाणाहून साहित्य मतदान केंद्रांवर रवाना करण्यात आले. नाशिक महापालिकेच्या 122 जागांसाठी उद्या सकाळी 7.30 ते 5.30 वाजेपर्यंत मतदान होणार आहे नाशिक महापालिकेच्या निवडणुकीसाठी एकूण 821 उमेदवार रिंगणात असून 275 अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे.
निवडणुकीसाठी 10 लाख 73 हजार मतदार असून 1407 मतदान केंद्रे असून त्यातील संवेदनशील 279 अतिसंवेदनशील 86 तर 77 स्फोटक मतदान केंद्रे आहेत. 11 मतदान केंद्रे आहेत. जिल्हा परिषदेच्या 73 गटांसाठी 336 उमेदवार असून पंचायत समितीच्या 146 जागांसाठी 1010 उमेदवार रिंगणात आहेत.
या निवडणुकीसाठी 2653 मतदान केंद्रे असून त्यातील 253 संवेदनशील तर 15 स्फोटक केंद्रे आहेत. एकूण 24 लाख मतदार या निवडणुकीत मतदान करणार आहेत. या निवडणुकीसाठी आहे. आज मतदान केंद्रांवर साहित्य रवाना झाले. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी 17 हजार 200 कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.
महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीसाठी वाढीव पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नाशिक महापालिका निवडणुकीसाठी साडे चार हजार पोलीस बंदोबस्त असल्याचे पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांनी सांगितलं.