नवरात्रोत्सवासाठी सज्ज : देवीच्या अलंकारांची सवाद्य मिरवणूक

By admin | Published: October 1, 2016 12:10 AM2016-10-01T00:10:55+5:302016-10-01T00:11:07+5:30

गडावर आजपासून होणार देवीचा जागर

Ready for Navratri festival: The special procession of the goddess ornamentation | नवरात्रोत्सवासाठी सज्ज : देवीच्या अलंकारांची सवाद्य मिरवणूक

नवरात्रोत्सवासाठी सज्ज : देवीच्या अलंकारांची सवाद्य मिरवणूक

Next

वणी : साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धेपीठ असलेल्या सप्तशृंगगडावर शनिवारपासून (दि. १) सुरू होणाऱ्या नवरात्रोत्सवाची तयारी पूर्ण झाली असून, सकाळी ७ वाजता देवीच्या अलंकारांची सवाद्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. ९ वाजता आरती होऊन घटस्थापना करण्यात येणार आहे. या उत्सवासाठी देशभरातून लाखो भाविक गडावर येतात त्यादृष्टीने नियोजन करण्यात येत आहे.
व्यापारीवर्गाने खरेदी-विक्रीच्या माध्यमातून मोठी आर्थिक उलाढाल होण्याचा अंदाज बांधत व्यावसायिक गणिते आखून तयारी केली आहे. नवरात्र ते कोजागरी पौर्णिमा या कालावधीत सुमारे दहा लाख भाविक अंदाजानुसार हजेरी लावतात. काही भाविक नवस पूर्तीसाठी, काही दर्शनासाठी प्रतिवर्षी परंपरा म्हणून हजेरी लावतात. या ठिकाणी भाविकांचा ओघ उत्तरोत्तर वाढत जातो. (वार्ताहर)

नियंत्रण कक्षाची स्थापना
रस्त्याच्या मध्यभागी दुकाने लावण्यास बंदी घालण्यात आली आहे. भाविकांच्या मदतीसाठी मध्यवर्ती नियंत्रण कक्षाची स्थापना ट्रस्ट कार्यालयात करण्यात आली आहे. या नियंत्रण कक्षात सर्व विभागांचे प्रत्येकी एक अधिकारी २४ तास उपलब्ध राहतील.

Web Title: Ready for Navratri festival: The special procession of the goddess ornamentation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.