संशोधनाची खरी सुरुवात पीएचडी नंतरच
By admin | Published: May 17, 2014 11:52 PM2014-05-17T23:52:21+5:302014-05-18T00:26:17+5:30
श्रीवास्तव : प्राध्यापकांसाठी फॅकल्टी डेव्हलपमेंट कार्यक्रम
श्रीवास्तव : प्राध्यापकांसाठी फॅकल्टी डेव्हलपमेंट कार्यक्रम
नाशिक : संशोधनाची खरी सुरुवात पीएचडीनंतरच सुरू होते, असे प्रतिपादन ज्येष्ठ संशोधक डॉ. सतीश श्रीवास्तव यांनी केले.
महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेचे पंचवटी कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स आणि पुणे विद्यापीठ यांच्यातर्फे वाणिज्य प्राध्यापकांसाठी फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॅम सुरू झाला. त्यावेळी ते बोलत होते. संस्थेचे समन्वयक आमदार डॉ. अरुण पाटील, डॉ. सतीश श्रीवास्तव, प्राचार्य डॉ. के. आर. शिंपी व्यासपीठावर उपस्थित होते. दीप्ती भुतडा यांनी स्वागत केले.
डॉ. श्रीवास्तव म्हणाले की, संगणक इंटरनेटमुळे ज्ञानाची नवीन दालने उघडली असून, शिक्षण क्षेत्रात क्रांती झाली आहे. त्यामुळे प्राध्यापकांनी स्वत:ला अद्ययावत ठेवून विद्यार्थ्यांची तृष्णा भागवावी. संशोधकाने पक्षपातीपणा करू नये. डॉ. शिंपी म्हणाले की, ज्ञानाबरोबरच गुणवत्ता आणि उपयुक्तता सिद्ध करणार्या विद्यार्थ्यांनाच उत्तम रोजगार संधी आहेत. व्यवसायाभिमुख विद्यार्थी घडविण्यासाठी प्राध्यापकांनी शिक्षणातील नवे प्रवाह आत्मसात करायला हवेत. बाराव्या पंचवार्षिक योजनेत उच्च शिक्षणाचा विस्तार, समान संधी, सवार्ेत्तमता, संशोधन, दर्जेदार शिक्षण, ई-गव्हर्नन्स फॅकल्टी डेव्हलपमेंटला महत्त्व देण्यात आले आहे. सध्या देशात आठशे विद्यापीठ आणि ३५ हजार महाविद्यालये आहेत. त्यांची संख्या पंधराशेने वाढणार आहे. डॉ. हरिष आडके म्हणाले, शिक्षणात गळतीचे प्रमाण भारतात मोठे आहे. १४ टक्के विद्यार्थीच पदवी घेतात. त्यामुळे संशोधन गरजेचे आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठ ११६७ साली तर पुणे विद्यापीठ १९४९ साली सुरू झाले. भारत संशोधनात अजूनही मागे आहे. संशोधनासाठी सखोल वाचन, चिंतन हवे, असेही डॉ. आडके म्हणाले.