चार वर्षांपासून १६ हजार झाडांचे संगोपन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2018 12:47 AM2018-06-05T00:47:29+5:302018-06-05T00:47:29+5:30

झाडे लावा, झाडे जगवा’ हे घोषवाक्य शालेय मुलांपासून तर वृद्धांपर्यंत सर्वश्रुत आहे. मात्र या घोषवाक्यातून बोध घेऊन कृतिशील उपक्रम राबविणारे बोटावर मोजण्याइतके लोक सभोवताली आढळतात. त्यापैकी एक म्हणजे हरित सैनिकांची आपलं पर्यावरण संस्था. या संस्थेचे स्वयंसेवक मागील चार वर्षांपासून १६ हजार ५०० झाडांचे यशस्वीरीत्या संगोपन करत आहे.

 Rearing up to 16,000 trees for four years | चार वर्षांपासून १६ हजार झाडांचे संगोपन

चार वर्षांपासून १६ हजार झाडांचे संगोपन

googlenewsNext

झाडे लावा, झाडे जगवा’ हे घोषवाक्य शालेय मुलांपासून तर वृद्धांपर्यंत सर्वश्रुत आहे. मात्र या घोषवाक्यातून बोध घेऊन कृतिशील उपक्रम राबविणारे बोटावर मोजण्याइतके लोक सभोवताली आढळतात. त्यापैकी एक म्हणजे हरित सैनिकांची आपलं पर्यावरण संस्था. या संस्थेचे स्वयंसेवक मागील चार वर्षांपासून १६ हजार ५०० झाडांचे यशस्वीरीत्या संगोपन करत आहे. झाडे जगविण्याचा ध्यास घेतलेल्या एका वृक्षप्रेमीने पंधरा वर्षे शहर व परिसरात ठिकठिकाणी स्वयंस्फूर्तीने जाऊन सुरक्षित जागेवर खड्डे खोदून झाडे लावण्याचा विडा उचलला. हे कार्य करताना चार वर्षांपूर्वी या वृक्षप्रेमीच्या डोक्यात एका सुपीक कल्पनेचा जन्म झाला आणि एकाच दिवशी दहा हजार रोपांच्या लागवडीचे उद्दिष्ट अन् ती जगविण्याचा ध्यास शेखर गायकवाड नावाच्या वृक्षप्रेमीसह शेकडो स्वयंसेवकांनी घेतला. त्यांच्या आपलं पर्यावरण संस्थेने २०१५ साली ‘वनमहोत्सव’ची हाक प्रथम नाशिककरांना दिली. नाशिककरांनी सातपूर भागात आयोजित असा उपक्रम पहिल्यांदाच अनुभवला आणि त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पर्यावरण दिनाच्या औचित्यावर दिवसभरात उद्दिष्टापेक्षा एक हजार रोपे अधिक लावली गेली. या उपक्रमाची पुनरावृत्ती संस्थेने २०१६ मध्ये पुन्हा केली आणि लोकसहभागातून सहा हजार पाचशे रोपांची लागवड करून म्हसरू ळ शिवारात वनमहोत्सव साजरा केला.  केवळ झाडे लावली आणि ती रामभरोसे सोडली असे या संस्थेने अजिबात केले नाही तर लावलेल्या सर्व झाडांच्या संगोपनाची जबाबदारी निष्ठेने पार पाडली. २०१५ पासून संस्था सातपूर येथे‘देवराई’ व म्हसरूळला ‘वनराई’ विकसित करण्यासाठी प्रयत्नशील आहे.
अशी जगविली रोपे
दोन्ही ठिकाणी लावण्यात आलेल्या झाडांची संपूर्ण जबाबदारी संस्थेच्या वतीने घेण्यात आली आहे. लावलेल्या रोपट्यांना वेळोवेळी पाणी, खत देणे, आजूबाजूला वाढलेले गवत कापणे, जाळपट्टा घेऊन वणव्यापासून संरक्षण करणे, रोपट्यांभोवती आळे करून दर आठवड्याला त्यामध्ये पाणी भरणे अशा विविध पद्धतीने संवर्धनाची कामे संस्थेचे हरित सैनिक मागील चार वर्षांपासून करत आहेत.

Web Title:  Rearing up to 16,000 trees for four years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.