माणूस अस्वस्थ असण्याचे कारण शिक्षण : महाजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 01:05 AM2019-05-20T01:05:13+5:302019-05-20T01:05:30+5:30
आज आपल्या देशामध्ये शिक्षण हे उत्पन्नाचे साधन मानले जाते. शिक्षणाच्या माध्यमातून चांगली नोकरी मिळवून प्रतिष्ठा मिळणार यासाठी शिक्षणाकडे बघितले जाते. परंतु सुविधा व पैसा असतानाही अनेक व्यक्ती अस्वस्थ असतात, त्याचे मूळ आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये आहे. त्यामुळे आपल्या देशात चांगला माणूस घडविणाऱ्या शिक्षणाची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन दीपस्तंभ फाउंडेशनचे यजुर्वेद महाजन यांनी केले
सिडको : आज आपल्या देशामध्ये शिक्षण हे उत्पन्नाचे साधन मानले जाते. शिक्षणाच्या माध्यमातून चांगली नोकरी मिळवून प्रतिष्ठा मिळणार यासाठी शिक्षणाकडे बघितले जाते. परंतु सुविधा व पैसा असतानाही अनेक व्यक्ती अस्वस्थ असतात, त्याचे मूळ आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये आहे. त्यामुळे आपल्या देशात चांगला माणूस घडविणाऱ्या शिक्षणाची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन दीपस्तंभ फाउंडेशनचे यजुर्वेद महाजन यांनी केले
ज्येष्ठ नागरिक मंडळ, सूर्योदय परिवार व लोकमान्य वाचनालयातर्फे नवीन नाशिक वंसत व्याख्यानमालेत स्व.कै. जयदेव ठाकूर यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ आयोजित स्मृती व्याख्यानात शिक्षण, करियर आणि आपण या विषयावर महाजन बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर विश्वास ठाकूर, विलास पोतदार, किरण सोनार, देवराम सौंदाणे आदी उपस्थित होते. यावेळी महाजन यांनी सांगितले की, मूलभूत तत्त्वांना महत्त्व देऊन चांगल्या सवयी जोपासल्या पाहिजे, त्यातूनच एक चांगला नागरिक निर्माण होऊ शकतो.
चांगला समाज घडविणे हे शिक्षणाच्या माध्यमातून शक्य आहे. कोणत्या कामातून अधिकारी पैसा मिळेल हे बघूनच करिअर निवडले जाते. संपूर्ण म्हणून जर आपण प्रगती करण्यासाठी समाजातल्या दिव्यांग आदिवासी आणि ग्रामीण भागातल्या शिक्षणाकडेही लक्ष देणे आवश्यक आहे, असेही महाजन यांनी सांगितले. परिचय नंदकुमार दुसानीस यांनी केला. स्वागत अनिल देवरे यांनी केले, तर रामदास शिंपी यांनी आभार मानले.