विद्रोही साहित्य संमेलनदेखील रद्द !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:15 AM2021-03-08T04:15:22+5:302021-03-08T04:15:22+5:30
राज्यात कोरोना महामारीच्या वाढत्या संकटाचा गंभीरपणे विचार करून विद्रोहीच्या राज्य कार्यकारिणीने नाशिक येथे संयोजन समितीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह चर्चा केली. ...
राज्यात कोरोना महामारीच्या वाढत्या संकटाचा गंभीरपणे विचार करून विद्रोहीच्या राज्य कार्यकारिणीने नाशिक येथे संयोजन समितीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह चर्चा केली. दरम्यान, कोरोनाचे नियम पाळून संयोजन समितीच्या बैठका, पूर्वतयारी सुरूच ठेवण्यात येणार असले तरी संमेलन अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्याचा निर्णयदेखील या बैठकीत घेण्यात आला. विद्रोही संमेलनाच्या अध्यक्षपदी साहित्यिक डॉ. आनंद पाटील यांची निवड करण्यात आली होते. मात्र, कोरोनाच्या वाढत्या प्रसाराचा विचार करून संविधानसन्मानार्थ १५ वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या राज्य अध्यक्ष प्रा. प्रतिमा परदेशी, कार्यकारी संघटक किशोर ढमाले, अर्जुन बागुल नाशिक संमेलनाचे स्वागताध्यक्ष शशिकांत उनव्हणे, मुख्य संयोजक राजू देसले यांनी संयुक्तपणे जाहीर केले.
(साहित्य संमेलनाच्या बातमीला चौकट - सीडीसाठी)