बंडखोर भाजपा नगरसेवकांना समज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2017 12:19 AM2017-09-29T00:19:09+5:302017-09-29T00:19:25+5:30

महापालिकेतील स्थायी समितीचे सभापती शिवाजी गांगुर्डे यांनी विविध सभांमध्ये घेतलेल्या निर्णयांना आक्षेप घेत शिवसेना, कॉँग्रेस, राष्टÑवादी, अपक्ष सदस्यांच्या सुरात सूर मिसळवत बंड पुकारणाºया सत्ताधारी भाजपाच्या ‘त्या’ चार सदस्यांना पक्षाने समज देत असला प्रकार खपवून घेतला जाणार नसल्याचा इशारा दिल्याचे समजते. भाजपा गटनेत्यांनीही सदरचा प्रकार गैरसमजुतीने झाल्याचे स्पष्टीकरण देत वादावर पडदा टाकला आहे.

Rebellious BJP corporators understand | बंडखोर भाजपा नगरसेवकांना समज

बंडखोर भाजपा नगरसेवकांना समज

Next

नाशिक : महापालिकेतील स्थायी समितीचे सभापती शिवाजी गांगुर्डे यांनी विविध सभांमध्ये घेतलेल्या निर्णयांना आक्षेप घेत शिवसेना, कॉँग्रेस, राष्टÑवादी, अपक्ष सदस्यांच्या सुरात सूर मिसळवत बंड पुकारणाºया सत्ताधारी भाजपाच्या ‘त्या’ चार सदस्यांना पक्षाने समज देत असला प्रकार खपवून घेतला जाणार नसल्याचा इशारा दिल्याचे समजते. भाजपा गटनेत्यांनीही सदरचा प्रकार गैरसमजुतीने झाल्याचे स्पष्टीकरण देत वादावर पडदा टाकला आहे.
स्थायी समितीच्या दहा सदस्यांनी नगरसचिवांना पत्र देऊन काही सभांची इतिवृत्ते मंजूर करू नये, अशी भूमिका घेतली आहे. त्यात सत्ताधारी भाजपातील मुकेश शहाणे, जगदीश पाटील, सुनीता पिंगळे व श्यामकुमार बडोदे यांचा समावेश होता. त्यामुळे स्थायी समितीतील भाजपा सदस्यांमधील संघर्ष उफाळून आला होता. सत्ताधारी पक्षातीलच सदस्यांनी आपल्या सभापतींविरुद्ध बंड पुकारल्याने विरोधकांना आणखी बळ मिळाले.
मात्र, सभापती शिवाजी गांगुर्डे यांनी नियमानुसारच कामकाज करण्याचा पवित्रा घेत विरोध करणारेच अनेक ठरावांना सूचक-अनुमोदक असल्याचे सांगत बंडखोरांची हवा काढून घेतली होती. स्थायीतील या संघर्षाचीच बुधवारी महापालिका वर्तुळात चर्चा होती. स्थायीतील भाजपा सदस्यांनी विरोधकांशी हातमिळवणी करण्याच्या कृतीची गंभीर दखल पक्षाने घेतली. भाजपाचे शहराध्यक्ष तथा आमदार बाळासाहेब सानप यांनी चारही सदस्यांना तातडीने पाचारण केल्याचे समजते. त्यातील जगदीश पाटील हे बाहेरगावी असल्याने उपस्थित राहू शकले नसल्याचेही सांगण्यात आले.

Web Title: Rebellious BJP corporators understand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.