कर्जमाफी, हमीभाव एकाच वेळी मिळावा

By admin | Published: June 29, 2017 01:09 AM2017-06-29T01:09:49+5:302017-06-29T01:10:03+5:30

सटाणा : भाजपाने निवडणूक जाहीरनाम्यात शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी व स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करण्याचे आश्वासन दिले होते.

Receive debt forgiveness, guarantees at the same time | कर्जमाफी, हमीभाव एकाच वेळी मिळावा

कर्जमाफी, हमीभाव एकाच वेळी मिळावा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
सटाणा : भाजपाने निवडणूक जाहीरनाम्यात शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी व स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करण्याचे आश्वासन दिले होते. सत्ता आल्यानंतर भाजपा सरकारने शेतकऱ्यांची घोर फसवणूक केली आहे. राज्य सरकारने केलेली कर्जमाफी हीदेखील फसवी असून, शेतकऱ्यांना त्याचा कोणताही लाभ होणार नाही. त्यामुळे आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आगामी काळात प्रखर लढा उभारला जाईल, असा इशारा शेतकरी मुक्ती मोर्चाचे प्रमुख पंडितराव भदाणे यांनी दिला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीची केलेली घोषणा ही फसवी असल्यामुळे ती नामंजूर करत आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आगामी काळात करण्यात येणाऱ्या आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी तालुक्यातील तळवाडे येथे पंचक्रोशीतील शेतकऱ्यांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत भदाणे बोलत होते. अध्यक्षस्थानी कडू अहिरे होते. यासाठी सर्वांनी पक्षीय राजकारण बाजूला ठेवून शेतकरी क्र ांती मोर्चाच्या झेंड्याखाली संघटित व्हावे, असे आवाहन भदाणे यांनी केले. यावेळी नाना भामरे, रवींद्र सोनवणे, कैलास बोरसे, भावराव ठाकरे यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी पंकज ठाकरे, राकेश अहिरे, नामदेव ठाकरे, केशव जाधव, नाना अहिरे, रामदास अहिर आदी उपस्थित होते.




.

Web Title: Receive debt forgiveness, guarantees at the same time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.