महिला बालकल्याण समितीचा ठराव प्राप्त

By Admin | Published: September 2, 2016 11:13 PM2016-09-02T23:13:31+5:302016-09-02T23:14:04+5:30

महिला बालकल्याण समितीचा ठराव प्राप्त

Receive the resolution of the Women's Child Welfare Committee | महिला बालकल्याण समितीचा ठराव प्राप्त

महिला बालकल्याण समितीचा ठराव प्राप्त

googlenewsNext

नाशिक : महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीवर नऊ सदस्यांची नियुक्ती झाल्याचा ठराव नगरसचिव विभागाकडे महापौरांकडून प्राप्त झाला असून, लवकरच सभापती निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. महिला व बालकल्याण समितीवर दरवर्षी नऊ सदस्यांची नियुक्ती केली जाते. विद्यमान समितीची मुदत १२ आॅगस्टला संपुष्टात आल्यानंतर नव्याने नऊ सदस्यांची पक्षीय तौलनिक संख्याबळानुसार नियुक्ती करण्यात आली. महापौर अशोक मुर्तडक यांनी आॅगस्टमध्ये झालेल्या महासभेत मनसेच्या अर्चना जाधव, रेखा बेंडकुळे व कांचन पाटील, शिवसेनेच्या शोभा निकम व ललिता भालेराव, राष्ट्रवादीच्या उषा अहेर व सुनीता शिंदे, भाजपाच्या ज्योती गांगुर्डे आणि कॉँग्रेसच्या वत्सला खैरे यांची नियुक्ती जाहीर केली. त्यानंतर सदर नियुक्तीचा ठराव महापौरांची स्वाक्षरी होऊन नगरसचिव विभागाला प्राप्त झाला असून, अहवाल विभागीय आयुक्तांकडे पाठविल्यानंतर सभापती निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Receive the resolution of the Women's Child Welfare Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.