दुष्काळग्रस्तांसाठी ८५ कोटी प्राप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2019 12:41 AM2019-02-19T00:41:17+5:302019-02-19T00:41:54+5:30
नाशिक : अपुऱ्या व कमी पर्जन्यमानामुळे खरिपाची पिके हातची गेलेल्या दुष्काळी तालुक्यातील शेतकºयांना शासनाने मदत करण्याचा निर्णय घेतल्याने त्यासाठी जिल्ह्णातील सुमारे साडेपाच लाख शेतकºयांना शासनाची आर्थिक मदत मिळणार असून, त्यासाठी मागणी केलेल्या सव्वाचारशे कोटी रुपयांपैकी शासनाने दुसºया टप्प्यातील ८५ कोटी रुपये सोमवारी उपलब्ध करून दिले.
नाशिक : अपुऱ्या व कमी पर्जन्यमानामुळे खरिपाची पिके हातची गेलेल्या दुष्काळी तालुक्यातील शेतकºयांना शासनाने मदत करण्याचा निर्णय घेतल्याने त्यासाठी जिल्ह्णातील सुमारे साडेपाच लाख शेतकºयांना शासनाची आर्थिक मदत मिळणार असून, त्यासाठी मागणी केलेल्या सव्वाचारशे कोटी रुपयांपैकी शासनाने दुसºया टप्प्यातील ८५ कोटी रुपये सोमवारी उपलब्ध करून दिले.
पहिल्या टप्प्यात शासनाने दिलेल्या ८५ कोटींपैकी ७३ कोटी रुपये शेतकºयांच्या खात्यात जमा झाले असून, दुसºया टप्प्यातील निधीही आता समसमान तालुक्यांमध्ये वाटप करण्यात येणार आहे. जिल्ह्णात यंदा पहिल्यांदाच भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण होऊन शेतकºयांच्या हातून पाण्याअभावी खरिपाची पिके गेली. संपूर्ण पावसाळ्यात सरासरी ८२ टक्के पर्जन्यमान नोंदविले गेले. त्यामुळे मालेगाव, नांदगाव, सिन्नर, चांदवड, देवळा, बागलाण, नाशिक, इगतपुरी या आठ तालुक्यांत गंभीर परिस्थिती निर्माण झाली. जिल्ह्या सारखी परिस्थिती राज्यातही निर्माण झाल्याने राज्य सरकारने दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर केली. त्याचबरोबर केंद्र सरकारने राज्याला मदत करावी यासाठी अहवाल पाठविला. (पान ७ वर)
या सर्व पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने राज्यासाठी काही मदत जाहीर केली असली तरी, त्यानुसार जिल्ह्णातील शेतकºयांची संख्या लक्षात घेता, जिल्ह्णासाठी ४२६ कोटी ७८ लाख ५६ हजार १५१ रुपयांची मदतीची गरज असून, तसा प्रस्तावही शासनाकडे रवाना केला त्यापोटी शासनाने गेल्या आठवड्यात ८५ कोटी २६ लाख ३३ हजार ६० रुपयांची मदत पाठविली असून, आठही तालुक्यांमध्ये सुमारे ७३ कोटींचे वाटप एका आठवड्यात करण्यात आले आहे. दुसºया टप्प्यातही शासनाने ८५ कोटी रुपये दिले असून, अशा पद्धतीने १७० कोटी रुपये जिल्ह्णाला प्राप्त झाले आहेत. नाशिक जिल्ह्णातील आठ तालुक्यांतील ५ लाख ४१ हजार २५७ शेतकºयांच्या चार लाख ८० हजार ६६६ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा अहवाल शासनाला सादर केला. शासनाने मे २०१३ मध्ये घेतलेल्या नैसर्गिक आपत्तीतील नुकसानीच्या निर्णयाप्रमाणे कोरडवाहू शेतकºयाला प्रती हेक्टरी ६८०० याप्रमाणे दोन हेक्टरप्रमाणे, तर बागाईती पिकासाठी १३,५०० रुपये हेक्टरी दोन हेक्टरपर्यंत व फळबागासाठी १८००० रुपये निश्चित केले आहेत.