जिल्ह्यासाठी हजारो लिटर जंतुनाशक औषध प्राप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2020 10:05 PM2020-05-04T22:05:45+5:302020-05-04T22:55:59+5:30
नाशिक : सध्या जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातला आहे. यापासून बचाव करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून वेळोवेळी हात धुणे, सॅनिटायझरचा वापर करणे आवश्यक आहे.
नाशिक : सध्या जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातला आहे. यापासून बचाव करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून वेळोवेळी हात धुणे, सॅनिटायझरचा वापर करणे आवश्यक आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष व पदाधिकारी यांच्या प्रयत्नाने व घरडा केमिकल यांच्या सहकार्याने नाशिक जिल्ह्यासाठी चार हजार लिटर सोडियम हायपोक्लोराइड हे जंतुनाशक औषध मोफत उपलब्ध करून देण्यात आले आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, उपाध्यक्ष डॉ. सयाजीराव गायकवाड, कृषी समितीचे सभापती संजय बनकर यांनी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागासे निर्देश दिले होते. ग्रामीण प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी सोडियम हायपोक्लोराइड हे जंतुनाशक औषध मोफत दिले. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंद पिंगळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, डॉ. रवींद्र चौधरी, डॉ. दावल साळवे, डॉ. दिनेश पाटील, साथरोग वैद्यकीय अधिकारी, कृषी विकास अधिकारी रमेश शिंदे यांच्या उपस्थितीत घरडा केमिकल्स यांनी सोडियम हायपोक्लोराईड प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी जिल्हा परिषदेकडे सुपूर्द करण्यात आले. घरडा केमिकलची मुंबई येथील कंपनी असून, सामाजिक बांधिलकी या नात्याने व सहकार्याच्या हेतूने साथीच्या काळामध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून आपले योगदान असावे हा दृष्टिकोन समोर ठेवून त्यांनी ही मदत केली आहे.