नाशिकचे काळाराम मंदिर अलिकडचे, त्यात फार वेगळे आढळणे अशक्यच : दिनेश वैद्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2019 09:41 PM2019-06-22T21:41:51+5:302019-06-22T21:45:40+5:30

नाशिक-  नाशिककरांचे श्रध्दास्थान असलेल्या श्री काळाराम मंदिराच्या सुशोभिकरणाचे काम सध्या सुरू असून त्यात आधी पायऱ्या सापडल्या त्यांनतर आता चबुतरा असल्याचे स्पष्ट झाले. मंदिर पुरातन आणि आकर्षक असल्याने त्याविषयी नाशिककरांना कुतहल वाटले नाही तर नवलच. परंतु संशोधकांच्या मते हे मंदिर दोनशे ते अडीचशे वर्षांपूर्वीचे असल्याने संशोधन या अनुषंघाने खूप असे जूने नाही. त्यामुळे त्याचे उत्खनन केले तरी सध्या चर्चा असल्याप्रमाणे भुयार किंवा तत्सम प्रकार आढळण्याची शक्यत नाही असे मत नाशिकमधील प्रसिध्द संशोधन आणि व्यास ओरिएंटशन रिसर्च सेंटरचे संचालक दिनेश वैद्य यांनी केले.

Recent Kalaram temple of Nashik, it is impossible to find very differently: Dinesh Vaidya | नाशिकचे काळाराम मंदिर अलिकडचे, त्यात फार वेगळे आढळणे अशक्यच : दिनेश वैद्य

नाशिकचे काळाराम मंदिर अलिकडचे, त्यात फार वेगळे आढळणे अशक्यच : दिनेश वैद्य

googlenewsNext
ठळक मुद्देमंदिराचे आणि नाथपंथीयांचे अतुट नाते हे मिश्र शैलीचे मंदिर

नाशिक-  नाशिककरांचे श्रध्दास्थान असलेल्या श्री काळाराम मंदिराच्या सुशोभिकरणाचे काम सध्या सुरू असून त्यात आधी पायऱ्या सापडल्या त्यांनतर आता चबुतरा असल्याचे स्पष्ट झाले. मंदिर पुरातन आणि आकर्षक असल्याने त्याविषयी नाशिककरांना कुतहल वाटले नाही तर नवलच. परंतु संशोधकांच्या मते हे मंदिर दोनशे ते अडीचशे वर्षांपूर्वीचे असल्याने संशोधन या अनुषंघाने खूप असे जूने नाही. त्यामुळे त्याचे उत्खनन केले तरी सध्या चर्चा असल्याप्रमाणे भुयार किंवा तत्सम प्रकार आढळण्याची शक्यत नाही असे मत नाशिकमधील प्रसिध्द संशोधन आणि व्यास ओरिएंटशन रिसर्च सेंटरचे संचालक दिनेश वैद्य यांनी केले.

प्रश्न: श्री काळाराम मंदिराच्या सुशोभिकरणाच्या निमित्ताने पाय-या आढळल्याने त्याबाबत बरीच चर्चा सुरू आहे. त्याचबरोबर अनेक प्रकारच्या अफवा पसरत आहे. त्या विषयी नेमके काय सांगाल?
वैद्य:  नाशिकचे काळाराम मंदिर हे मुळातच शहराच्या मध्यवर्ती आता आहे. सध्या याठिकाणी पाय-या किंवा चबुतरे खोदकाम करताना आढळले. याविषयी बरीच उलट सुलट चर्चा सुरू असली तरी त्यात तथ्यांचा अभाव आहे. मुळातच हे मंदिर दोनशे ते अडिचशे वर्षांपूर्वीपर्यंतचे आहे. म्हणजे संशोधनाची पार्श्वभूमी बघितली तर त्यादृष्टीने खूप जुने नाही. मंदिराची एकुण रचना बघता मंदिराच्या सर्वच बाजूने जेथे पाय-या आहेत तेथे ओटे (चबुतरे) आणि पाय-या होत्या आणि रहाणारच. मंदिराचा मागील बाजुही खोलगट असल्याने तेथे मात्र तशी सोय नाही. मंदिर बांधताना विशेष काळजी घेतली गेली असून प्रवेशव्दारावरूनच श्री राम, लक्ष्मण सीता यांच्या मुर्तींचे दर्शन होईल अशी रचना असल्याने हा भाग स्वरूपाचा आहे. सध्या सुरू असलेल्या संशोधनात ज्या पाय-या सापडल्याचे सांगितले जाते त्या अलिकडचे म्हणजेच चाळीस पन्नास वर्षांपूर्वी जमिनीचा भाग वर आल्याने खाली दबल्या गेल्या आहेत. त्या आता खोदकामात सापडणे स्वाभाविक आहे. परंतु म्हणून खूप काही सापडले किंवा सापडेल असे वाटत नाही. भुयार देखील या भागात सापडेल असे वाटत नाही.

प्रश्न: पुरातत्व विभागाने यात आणखी संशोधन करावे असे वाटते का?
वैद्य: माझ्या मते अशाप्रकारच संशोधन पुरातत्व खाते करणार नाही. कारण मंदिर निर्मितीचा काळ हा दोनशे अडीचशे वर्षांपूर्वींचा आहे. किमान हजारेक वर्षांपूर्वीचे मंदिर असते तर त्यात पुरातत्व खात्याने लक्ष घातले असते परंतु आता त्यात फारसे संशोधन होईल असे वाटते नाही.

प्रश्न: मंदिराच्या शैली आणि प्राचीनतेविषयी काय सांगाल?
वैद्य : नाशिकमधील हा परिसर प्रामुख्याने नाथ पंथीयांच्या ताब्यातील होता.म्हणजे त्यांच्या जमिनी होत्या. मंदिरासाठी जागा देताना रंगराव ओढेकर यांना दिलेल्या सूचनेनुसार त्याचे बांधकाम झाले आहे. या मंदिराचे आणि नाथपंथीयांचे अतुट नाते आहे. त्यामुळे सिंंहस्थात हे मंदिर गाभारा आणि पुजेपलिकडे पुर्णत: नाथ पंथीयांकडे असते. त्यांचा ज्या पध्दतीचा त्यावेळी करार झाला असेल त्या पध्दतीने त्या मंदिराचा त्यावेळी त्यांच्या कडे ताबा दिला जातो. मंदिराचे बांधकाम हे वास्तुशास्त्राच्या दृष्टीने खास तयार करण्यात आले असून प्रवेशव्दारावर उभे राहील्यावर मंदिरातील मूर्ती दृष्टीस पडतात. किंवा त्याचप्रमाणे सूर्यकिरणे मंदिरातील मूर्तींवर पडतील, अशीच त्याची रचना केली आहे. काहींच्या मते ही मान्सार शैली आहे किंवा हेमाडपंथी शैली आहे असे सांगितले जाते परंतु तसे नसून हे मिश्र शैलीचे मंदिर आहे. मंदिराच्या रचना त्यावरील मूर्ती बघता हे मिश्र शैलीतील बांधकाम आहे. मातीवर दगड रचून मंदिराचे बांधकाम झाले आहे.

प्रश्न: या ठिकाणी भुयार आहे किंवा सीता गुंफा संदर्भातील देखील मध्यंतरी अशा चर्चा होत्या, त्याविषयी काय वाटते?
वैद्य: १८४०- १८९२ अशा अनेक गॅझेटमध्ये मंदिर तसेच सीता गुंफा याविषयी माहिती आहे. परंतु आता त्यात बराच बदल झाला आहे. सीता गुंफेचे नक्की ठिकाण कोणते याबाबतही मतभिन्नता आहे. सध्याची सीतागुंफेची जागा ही गोसावी समाजाची आहे. तेथून रामशेजपर्यंत खरोखरीच भुयार आहे किंवा नाही, किंवा सीता गुंफेची जागा नक्की कोणती, मैथॉलॉजीकल गोष्टीत ब-याचवेळा तसे असेल असे सिध्द करता येत नाही.

मुलाखत- संजय पाठक

Web Title: Recent Kalaram temple of Nashik, it is impossible to find very differently: Dinesh Vaidya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.