वाडीव-हेत आरोग्य कमर्चारी यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2020 02:35 PM2020-08-28T14:35:56+5:302020-08-28T14:36:49+5:30
वाडीव-हे : कोरोना संकटात मोठ्या संख्येने कोरोना रुग्ण सापडत असतांना देखील घरोघरी जावून तपासणी करणाऱ्या आशा स्वंयसेविका तसेच आरोग्य कमर्चारी यांचा उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
वाडीव-हे : कोरोना संकटात मोठ्या संख्येने कोरोना रुग्ण सापडत असतांना देखील घरोघरी जावून तपासणी करणाऱ्या आशा स्वंयसेविका तसेच आरोग्य कमर्चारी यांचा उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
वाडीव-हे प्राथमिक आरोग्य केन्द्राचे वैद्यकीय अधिकारी,कमर्चारी,आशा स्वंयसेविका,रुग्नवाहिक़ा चालक यांचा कोरोना काळात स्वत:चा जीव धोक्यात घालून काम केल्याबद्दल येथील सामाजिक कार्यकर्ते किरण रत्नाकर कातोरे यांनी व त्यांच्या मित्रांनी सत्कार केला. अतिशय संकटाच्या काळात वाडीव-हे आरोग्य केंद्र अंतर्गत कोरोना बाधित रुग्ण मोठ्या संख्येने मिळून येत असतांनाही वैद्यकीय अधिकारी डॉ. माळी यांच्या मार्गदशर्नाखाली कमर्चारी व आशा स्वंयसेविका यांनी धैर्याने काम केले.त्यांचा सत्कार होने गरजेचे आहे, यामुळे त्यांना नक्कीच प्रेरणा मिळेल असे यावेळी बोलताना किरण कातोरे यांनी सांगितले. यावेळी वैभव कातोरे,प्रतीक अहिरराव, आकाश कोठुळे, आदित्य कातोरे, आकाश कातोरे, अनिकेत गोडसे, वैभव दातीर, संतोष कोरडे, आदी उपस्थित होते.