मुकणे धरणातून आवर्तन सुटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2020 12:52 AM2020-02-22T00:52:16+5:302020-02-22T01:13:09+5:30
इगतपुरी तालुक्यातील दारणा आणि मुकणे या दोन्ही धरणांतून यंदाच्या हंगामातील पहिले आवर्तन नाशिक पाटबंधारे विभागाच्या आदेशावरून सोडण्यात आले. विशेष म्हणजे चालू हंगामातील हे पहिलेच आवर्तन असून, दारणा धरणाच्या जलविद्युत प्रकल्पाद्वारे सुमारे ९०० क्यूसेक तर मुकणे धरणातून ६०० क्यूसेक पाणी सोडले आहे. दारणा धरणाचे पाणी वैजापूर कालव्यासाठी, तर मुकणे धरणाचे पाणी कोपरगाव, राहात्यासाठी सोडण्यात आले आहे.
नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील दारणा आणि मुकणे या दोन्ही धरणांतून यंदाच्या हंगामातील पहिले आवर्तन नाशिक पाटबंधारे विभागाच्या आदेशावरून सोडण्यात आले. विशेष म्हणजे चालू हंगामातील हे पहिलेच आवर्तन असून, दारणा धरणाच्या जलविद्युत प्रकल्पाद्वारे सुमारे ९०० क्यूसेक तर मुकणे धरणातून ६०० क्यूसेक पाणी सोडले आहे. दारणा धरणाचे पाणी वैजापूर कालव्यासाठी, तर मुकणे धरणाचे पाणी कोपरगाव, राहात्यासाठी सोडण्यात आले आहे.
इगतपुरी तालुक्यात यंदा सरासरीच्या १५० टक्के पाऊस झाला. त्यामुळे शेतपिकांचे अतोनात नुकसान झाले. तर दुसरीकडे तालुक्यातील सर्वच धरणे शंभर टक्के भरून पाण्याचा मुबलक साठा तयार झाला. त्यामुळे नांदूरमधमेश्वर आणि जायकवाडी प्रकल्पांमध्ये गेल्या वर्षांच्या तुलनेत अधिक पाणीसाठा तयार झाला आहे. मराठवाडा आणि अन्य भागाला पुढचे काही वर्षं पुरेल इतके पाणी मुकणे प्रकल्पामध्ये साचल्याने यंदा फेब्रुवारीपर्यंत इगतपुरी तालुक्यातील दारणा आणि मुकणे धरणातील पाणीसाठा जैसे थे आहे, मात्र उन्हाची तीव्रता आणि कोपरगाव, राहाता तसेच वैजापूर कालव्यात पाण्याची आवश्यकता भासू लागल्यामुळे नाशिक पाटबंधारे विभागाने पाणी सोडण्याचा निर्णय घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.