भाडेतत्त्वावरील वाहनांची परस्पर विल्हेवाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2017 11:32 PM2017-11-01T23:32:16+5:302017-11-02T00:14:37+5:30
अंबड औद्योगिक वसाहतीतील दोन कंपन्यांमध्ये वाहन भाडेतत्त्वावर व्यवसायासाठी देतो, असे वाहनमालकांना सांगून वाहनांची परस्पर विल्हेवाट लावल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात संशयित सुजित पंढरीनाथ पवार याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
सिडको : अंबड औद्योगिक वसाहतीतील दोन कंपन्यांमध्ये वाहन भाडेतत्त्वावर व्यवसायासाठी देतो, असे वाहनमालकांना सांगून वाहनांची परस्पर विल्हेवाट लावल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात संशयित सुजित पंढरीनाथ पवार याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ विकास रघुनाथ भालेराव (रा. किशोर सूर्यवंशी मार्ग, दिंडोरीरोड, नाशिक) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित सुजित पंढरीनाथ पवार याने भालेराव यांच्या मालकीची इनोव्हा कार व आणखी दोन वाहनमालकांना १० जानेवारी ते ३१ आॅक्टोबर या कालावधीत अंबड औद्योगिक वसाहतीतील क्रॉम्प्टन ग्रीव्हज प्रा. लि. व शिर्के प्रा. लि. या कंपनीत करारनामावर भाडेतत्त्वावर लावून देतो, असे सांगितले़ यावर विश्वास ठेवत वाहनमालकांनी आपली वाहने पवारच्या ताब्यात दिली असता या वाहनांची त्याने परस्पर विल्हेवाट लावली़ कार मालकांनी याबाबत कंपनीशी संपर्क केल्यानंतर अशा प्रकारचा करारनामाच केला नसल्याचे तसेच वाहनांची परस्पर विल्हेवाट लावून फसवणूक केल्याचे समोर आले़ या प्रकरणी अंबड पोलिसांनी संशयित पवार विरोधात गुन्हा दाखल केला असून, आणखी कोणाची फसवणूक झाली असल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी केले आहे़