करोना महासंकट निवारणासाठी भक्तामर स्तोत्र पठण फलदायी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2020 11:21 PM2020-09-25T23:21:35+5:302020-09-26T00:44:08+5:30
देवळाली कॅम्प : सर्व विश्वावर आलेले करोना विषाणूचे संकट निरसन करण्यासाठी महाप्रभावक व महामंत्र असलेल्या 'भक्तामर स्तोत्र ' पठण करणे फलदायी असून प्रत्येकाने या स्तोत्राचे नियमित पठण करावे असे आवाहन संकल्पमूर्ती महासतीजी प.पु मधुस्मिताजी महाराज साहेब यांनी केले.
देवळाली कॅम्प : सर्व विश्वावर आलेले करोना विषाणूचे संकट निरसन करण्यासाठी महाप्रभावक व महामंत्र असलेल्या 'भक्तामर स्तोत्र ' पठण करणे फलदायी असून प्रत्येकाने या स्तोत्राचे नियमित पठण करावे असे आवाहन संकल्पमूर्ती महासतीजी प.पु मधुस्मिताजी महाराज साहेब यांनी केले.
लामरोड येथील विरायतन सोसायटीमध्ये या वैश्विक संकटाच्या निवारणासाठी प.पु मधुस्मिताजी यांसह साध्वीश्री भावप्रीतिजी, विद्या जैन, श्रीनिवास जैन आदींसह या ४८ स्तोत्रांचे नियमित 'मधुमाधवी' रागात अनुष्ठान सुरू करण्यात आले आहे. या भक्तामर स्त्रोत्रांची रचना उज्जैन येथे आचार्यमुनी पुंगव मानतुंगस्वामी यांनी सातव्या शतकात शुद्ध संस्कृत भाषेत तर मंदाक्रांत वृत्तात व वसंत तिलका छंदात केली आहे. या पौराणिक महत्त्व असलेल्या भक्तामर स्त्रोत्राच्या पठणाचे अनेक अलौकिक व लौकिक लाभ आहेत. ज्याचे पठण जैन समाजाच्या चारही संप्रदायासह जैनेत्तर भाविक करीत अनुभव घेत असतात. कुठल्याही स्तोत्र आणि मंत्राची सफलता ही साधक साधना आणि साध्य यावर आधारित असते.त्यासाठी श्रद्धा, भक्ती व संकल्प दृढ असणे आवश्यक असते. शुद्ध उच्चारण- पवित्र वातावरण आणि शुद्ध आचरण हे साधनेच्या सिद्धीसाठी आवश्यक आहे. अशा पवित्र वातावरणात या स्तोत्राचे अनुष्ठान सर्व भाविकांनी दररोज सकाळी १० ते १०: ४५ वाजेदरम्यान नियमित करणे आवश्यक आहे. याशिवाय चांदवड येथील श्री नेमिनाथ जैन ब्रह्मचर्य आश्रमाच्या प्राचार्या संगीता बाफणा या आपल्या सहकाऱ्यांसह या अनुष्ठानाचे युट्युब व झूम अँपद्वारे नियमित प्रक्षेपण करत आहे. त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा व आपले जीवन निरोगी व निरामय बनवावे असे आवाहन त्यांनी यानिमित्ताने केले आहे.
(फोटो ल्ल२‘ वर)