समाज माध्यमातून नाटकांचे अभिवाचन ; इ-नृत्य वर्गांनाही मिळतोय प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2020 03:40 PM2020-06-07T15:40:03+5:302020-06-07T15:43:31+5:30
सध्या नाट्यगृहे ,चित्रपटगृहे बंद असल्याने कलाकारांची तसेच प्रेक्षकांची निराशा होत आहे. त्यामुळे कलाकारांनी आणि गायकांनी रोज एक राग गाऊन त्याचे विश्लेषण करण्यास सुरु वात केली आहे. यातील बहुतांश कलाकारांनी फेसबुकवरच आपली कला सादर केली आहे .
नाशिक: कोरोनामुळे कलाकारांना रंगमंच उपलब्ध नसल्यामुळे अनेक कलाकारांनी आता समाज माध्यमांचा आधार घेतला असून नाट्य संस्थांनी इंस्टाग्राम व फेसबुकवर विविध नाटकांचे अभिवाचन सुरू केले आहे. त्याला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. तसेच ई नृत्य वर्गांना देखील प्रतिसाद मिळत असून संगीत क्लास देखील आॅनलाईन पद्धतीने सुरु आहेत.
सध्या नाट्यगृहे ,चित्रपटगृहे बंद असल्याने कलाकारांची तसेच प्रेक्षकांची निराशा होत आहे. त्यामुळे कलाकारांनी आणि गायकांनी रोज एक राग गाऊन त्याचे विश्लेषण करण्यास सुरु वात केली आहे. यातील बहुतांश कलाकारांनी फेसबुकवरच आपली कला सादर केली आहे . तर काही कलाकारांनी आपल्या गाजलेल्या जुन्या मैफलींचे व्हिडीओ टाकण्यास सुरु वात केली आहे. अनेक अभिनेत्यांनी नामवंत कवींच्या रचना आपल्या आवाजात म्हणत रिसकांसमोर सादर करण्यास सुरु वात केली आहे .ज्येष्ठ अभिनेते सदानंद जोशी आणि हेमा जोशी यांनी नामवंत कवींच्या कविता सादर केल्या . तसेच डॉ. आशिष राणे यांची भजने देखील सादर करण्यात येत आहे . त्याचप्रमाणे ज्येष्ठ व्हायोलीन वादक अनिल दैठणकर व सुवर्णा क्षीरसागर यांच्याकडून रोज नवीन गाण्याची रसिकांना मेजवानी मिळत आहे. चित्रकार देखील आपली चित्रे सादर करत आहेत. तसेच व्यंगचित्रकारांच्या ग्रुपमधून देखील व्यंगचित्रे सादर करण्यात येत आहेत. तबला वादक रोज आपल्या शिष्यांना आॅनलाईन तबलावादन शिकवत आहेत. तर कथ्थक नृत्यांगना देखील आपल्या शिष्यांना नृत्याचे धडे देत आहेत .