नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टरला इनोव्हेशन सेंटरची मान्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2018 01:16 IST2018-10-06T01:16:47+5:302018-10-06T01:16:56+5:30
नावीन्यपूर्ण प्रकल्पांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्यभरातून नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टरला इनोव्हेशन सेंटर देण्याची मान्यता गुरुवारी राज्यपालांच्या हस्ते देण्यात आली.

नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टरला इनोव्हेशन सेंटरची मान्यता
सिडको : नावीन्यपूर्ण प्रकल्पांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्यभरातून नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टरला इनोव्हेशन सेंटर देण्याची मान्यता गुरुवारी राज्यपालांच्या हस्ते देण्यात आली.
राज भवनात गेल्या बुधवारी (दि.३) रोजी झालेल्या समारंभात नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टरला राज्यभरातून ‘इन्क्युबेशन पार्टनर’ म्हणून घोषित करण्यात आले. यावेळी नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टरचे अध्यक्ष सोबतच स्टार्टअप इंडिया महाराष्ट्र यात्रेच्या शुभारंभाचा झेंडा दाखविण्यात आला.
देश- विदेशात उद्योग असल्याने आपणही या स्टार्टअप चाच भाग असल्याचे नरेंद्र गोलिया यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले. या नव्या उपक्रमाच्या माध्यमातून नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टरला नव्या क्षेत्रात काम करण्याची संधी लाभणार आहे. आज नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टर हे नाशिकच्या उद्योग विकासांचे आधारस्तंभ बनले आहे. माजी अध्यक्ष विक्रम सारडा, शरद शाह यांच्यासारख्या कुशल नेतृत्वांच्या सक्षम पाठबळामुळे उद्योजकता विकसित करण्यात सहकार्य होत असल्याचे सांगितले.
यावेळी नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टरचे अध्यक्ष नरेंद्र गोलिया यांना पत्र हस्तांतरित करण्यात आले. यावेळी केंद्रीय मंत्री सूरेश प्रभू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षणमंत्री विनोद तावडे,असीम गुप्ता आदीं उपस्थित होते.