मालेगावी भुयारी गटार योजनेला मान्यता

By admin | Published: July 7, 2017 11:22 PM2017-07-07T23:22:50+5:302017-07-07T23:37:15+5:30

मालेगाव : भुयारी गटार प्रकल्पास अमृत योजनेत समावेश करण्यात आल्याची माहिती ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी दिली.

Recognition of Malegaavi underground drainage scheme | मालेगावी भुयारी गटार योजनेला मान्यता

मालेगावी भुयारी गटार योजनेला मान्यता

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मालेगाव : गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या शहरातील भुयारी गटार प्रकल्पास अमृत योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात समावेश करण्यात आला असून, मालेगावसाठी १५० कोटींची तरतूद करण्यात आल्याची माहिती ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
भुयारी गटार प्रकल्पासंदर्भात राज्यमंत्री भुसे यांनी मुख्यमंत्र्यांकडे अमृत योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात समावेश करण्याची मागणी केली होती. मुख्यमंत्र्यांनी मालेगाव भुयारी गटारीचा समावेश करून केंद्र शासनास पाठविण्याचे आदेश नगरविकास विभागास दिले होते. केंद्र शासनाने अमृत योजनेचा दुसरा टप्पा महाराष्ट्रासाठी तीन हजार २८० कोटींच्या प्रस्तावांना मान्यता दिली असून, त्यात मालेगावसाठी १५० कोटींचा समावेश आहे. हद्दवाढीतील गावांचा भूमिगत गटार योजनेत समावेश करावा, अशी विनंती मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली असून, त्यासाठी जास्तीच्या निधीची मागणी करण्यात आल्याचे भुसे यांनी यावेळी सांगितले. नदीच्या सांडपाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होत असल्यामुळे नागरिकांनी भुयारी गटार योजना राबविण्याची मागणी केली होती.

Web Title: Recognition of Malegaavi underground drainage scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.