निसाकाच्या कर्जमुक्ती प्रस्तावाला मान्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2018 11:59 PM2018-04-18T23:59:21+5:302018-04-18T23:59:21+5:30
नाशिक : जिल्हा मध्यवर्ती बॅँकेकडे कर्जापोटी तारण ठेवलेली निफाड सहकारी साखर कारखान्याची १०५ एकर जागा विक्री करून त्यापोटी मिळणारी रक्कम जिल्हा बॅँकेच्या कर्ज खात्यात भरण्याच्या प्रस्तावाला सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी हिरवा कंदील दर्शविला असून, जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टनेही त्यास तत्त्वत: मान्यता देऊन लवकरच हा प्रस्ताव बोर्डाच्या मंजुरीसाठी ठेवण्याचे मान्य केले आहे.
नाशिक : जिल्हा मध्यवर्ती बॅँकेकडे कर्जापोटी तारण ठेवलेली निफाड सहकारी साखर कारखान्याची १०५ एकर जागा विक्री करून त्यापोटी मिळणारी रक्कम जिल्हा बॅँकेच्या कर्ज खात्यात भरण्याच्या प्रस्तावाला सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी हिरवा कंदील दर्शविला असून, जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टनेही त्यास तत्त्वत: मान्यता देऊन लवकरच हा प्रस्ताव बोर्डाच्या मंजुरीसाठी ठेवण्याचे मान्य केले आहे.
केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी निफाडजवळ शेतकऱ्यांसाठी ड्रायपोर्ट तयार करण्याची घोषणा केल्यानंतर खºया अर्थाने या विषयाला चालना मिळाली आहे. या ड्रायपोर्टसाठी निफाड सहकारी साखर कारखान्याच्या ताब्यातील सुमारे शंभर एकर जमिनीचा विचार त्यासाठी करण्यात आला. या जमिनीला लागूनच रेल्वेमार्ग गेलेला असल्यामुळे तेथून मालाची ने-आण करणे सहज शक्य होणार असल्याने जेएनपीटीनेदेखील या जागेची पाहणी करून त्यासाठी हिरवा कंदील दर्शविला होता. त्या पार्श्वभूमीवर मंगळवारी मुंबईत सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. त्यात बॅँकेने दिलेला प्रस्तावाला सहकारमंत्र्यांनी सहमती दर्शवित जेएनपीटीला तसे सूचित केले. जिल्हा बॅँकेचे कारखान्यावर १५९ कोटींचे कर्ज असले तरी, बॅँकेने व्याज व दंड माफ करून मुद्दल घ्यावी व त्यासाठी वनटाइम सेटलमेंट करावी, अशी सूचना सहकारमंत्र्यांनी केली. त्यावर १०५ कोटी रुपये घेण्यावर जिल्हा बॅँकेने सहमती दर्शविली आहे. यासंदर्भातील प्रस्ताव जेएनपीटीचे निरज बन्सल यांना देण्यात आला आहे. या बैठकीस डॉ. प्रशांत पाटील, सुरेशबाबा पाटील, जिल्हाधिकारी राधाकृष्णन, प्रांत अधिकारी महेश पाटील व जिल्हा बॅँकेचे प्रतिनिधी उपस्थित होते. नाशिक जिल्ह्णासह लगतच्या जिल्ह्णातील शेतकºयांचा नाशवंत माल तत्काळ ड्रायपोर्टच्या माध्यमातून रेल्वेमार्गाने उरणच्या जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट बंदरात नेऊन तेथून तो परदेशात जलदगतीने पोहोचविण्यासाठी ड्रायपोर्ट महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.निफाड सहकारी साखर कारखान्यावर जिल्हा बॅँकेचे सुमारे १५९ कोटी रुपये कर्ज थकीत असून, त्या कर्जाच्या वसुलीसाठी कारखान्याची तारण असलेल्या मालमत्ता विक्री करण्याची प्रक्रिया बॅँकेने यापूर्वीच राबविली आहे. तथापि, त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. परिणामी बॅँकेची वसुलीही रखडली आहे. अशा परिस्थितीत ड्रायपोर्टसाठी कारखान्याची जागा घेण्याची तयारी जेएनपीटीने दर्शविल्याने जिल्हा बॅँकेच्या
अपेक्षा उंचावल्या आहेत. जेएनपीटीने कारखान्याची जमीन खरेदी करून त्यापोटी मिळणारी रक्कम बॅँकेच्या कर्जखात्यात भरावी, असा प्रस्ताव बॅँकेने दिला आहे.