प्राथमिक आरोग्यकेंद्र बांधकामास मान्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2018 01:06 AM2018-12-14T01:06:28+5:302018-12-14T01:06:47+5:30
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीने प्रस्तावित करण्यात आलेल्या दोन प्राथमिक आरोग्य केंद्र व एका उपकेंद्राच्या इमारत बांधकामास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी आज प्रशासकीय मान्यता दिली.
नाशिक : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीने प्रस्तावित करण्यात आलेल्या दोन प्राथमिक आरोग्य केंद्र व एका उपकेंद्राच्या इमारत बांधकामास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी आज प्रशासकीय मान्यता दिली. नाशिक तालुक्यातील धोंडेगाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत बांधण्यात येणार असून, यासाठी २ कोटी ४९ लक्ष ९९ हजार रकमेस, तर दिंडोरी येथील खेडगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी २ कोटी ९१ लक्ष ५० हजार एवढ्या रकमेस प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. निफाड तालुक्यातील चितेगाव येथे उपकेंद्र बांधण्यासाठी ५३ लक्ष रु पयांच्या खर्चास मंजुरी देण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. डेकाटे यांनी दिली.